Home अकोला “त्या” शेतमालकावर गुन्हा दाखल होऊन अटक

“त्या” शेतमालकावर गुन्हा दाखल होऊन अटक

42
0

हिवरखेड,दि.12 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-आनंद बोदडे ):- तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील पशुपालक राजीक खा रशीद खा वय अंदाजे 55 हे दि 11 ऑक्टोंबर रविवार रोजी पहाटे गुरांसाठी चारा आणण्याकरिता गेले असता हिवरखेड येथे राहणारे शेतकरी अशोक कराळे यांच्या तळेगाव खुर्द शेतशिवारातील शेतात तारांचे कुंपण मध्ये विद्युत प्रवाह सोडलेला असल्यामुळे विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श होऊन शॉक लागून राजीक खा यांचा जागीच मृत्यू झाला होता. ह्या घटनेची फिर्याद मृतकाचे भाऊ कासिम खा रा. झरी यांनी हिवरखेड पोलिसात दिली. हिवरखेड पोलिसांनी शेतीमालक अशोक लक्ष्मण कराळे वय 55 यांना याप्रकरणी अटक करून त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 304 नुसार गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास हिवरखेड पोलिस करत आहेत

Previous articleपिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेच्या ३८ व्या वर्धापन दिन पालिकेत साजरा
Next articleताथवडे गायरणातील शेकडो वृक्षांवर जेसीबी ;बांधकाम व्यवसायिकाचा उद्दामपणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + 3 =