Home ताज्या बातम्या आदिवासीसाठींच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार शेळके कठीबध्द

आदिवासीसाठींच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार शेळके कठीबध्द

37
0

तळेगाव,दि.29 सप्टेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-आदिवासीच्या विकासाच्या योजनानकडे दुर्लक्ष करु नये ते व्यवस्थित पणे पोचवण्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके योजना राबवण्यासाठी कठीबध्द
आदिवासी विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व तालुक्यातील आदिवासी बांधवांसमवेत सोमवार दि.28 रोजी आमदार सुनिल शेळके यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली
आदिवासी समाजासाठी असणाऱ्या योजनांचे स्वरुप व अंमलबजावणी यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासन स्तरावर अनेक योजना आहेत. परंतु काही योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही. तर काही योजनांसाठी लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.माञ येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात तळागाळापर्यंत योजना राबविल्या जातील. व आदिवासी बांधवांना या योजनांचा लाभ घेता येईल. अनेक योजना आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणार्‍या ठरतील. सर्व अधिकाऱ्यांचेही यासाठी सहकार्य मिळणार आहे. असे आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले.

शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत आदिवासी बांधवांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज स्वरूपात बीज भांडवल देण्यात येते. तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी आर्थिक मदत कर्जरुपात दिली जाते. कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या आदिवासींसाठी सरकारकडून खावटी अनुदान योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळ आणि नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तांकडून प्रस्तावित खावटी अनुदान योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता मिळाली आहे.
यावेळी बैठकीस एस.एस.पिंगळे उपप्रादेशिक व्यवस्थापक घोडेगाव, श्रीमती आर.ओ.रॉय सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक जुन्नर, आर.बी.मगटराव प्रभारी शाखा व्यवस्थापक शबरी कार्यालय जुन्नर, एम.एम.दवणे विपणन निरीक्षक घोडेगाव, एस.के. वाणी व इतर अधिकारी उपस्थित होते.
तसेच शंकरभाऊ बोऱ्हाडे, शंकरराव सुपे माजी सभापती, राघुजी तळपे अध्यक्ष राष्ट्रवादी आदिवासी सेल, नारायण काठे, किसन सुपे, सतूजी दगडे, नागोजी डोंगे, गबळु लांघी, नारायण चिमटे, ज्ञानेश्वर आढाळे, किरण हेमाडे, दिलीप बगाड, किरण हिले, लहु पोफळे, शंकर हेमाडे, बाबू वाजे, भाऊ मोरमारे माजी सरपंच, मारुती चिमटे, सखाराम केंद्रे, कैलास करवंदे व इतर आदिवासी बांधव उपस्थित होते.

Previous articleपंडीत दीनदयाळ जंयती सेवासप्ताह निमित्त पक्षनेते नामदेव ढाके यांचा प्रभागात एलईडी बल्ब वाटपाचा उत्सुकत उपक्रम
Next articleस्केल्स अॅण्ड टेल्स टिम ने वनअधिकारीच्या उपस्थित दिले अनेक सर्पाना जीवदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 7 =