Home ताज्या बातम्या किवळे- आदर्शनगर; अनैतीक प्रेमसंबधातुन प्रियकरानेच केला खुन

किवळे- आदर्शनगर; अनैतीक प्रेमसंबधातुन प्रियकरानेच केला खुन

0

किवळे- आदर्शनगर,दि.27 सप्टेबंर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- अनैतिक तरुणीचा गळा आवळुन डोक्यात दगड घालुन खून करण्यात आला आदर्श नगर धारस्कर हॉस्पिटलच्या पाठीमागे खदान मध्ये महिलेचा मृतदेह पाण्यात टाकण्यात आला होता, सदर घटना 25 सप्टेंबर रोजी घडली असून अरोपीने कबुली दिली आहे या मृत महिलेची बहीण फिर्यादी हिने अपहरणाची तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून अरोपी प्रशांत सुर्यकांत गायकवाड याला पोलिसांनी सापळा रचुन अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांने अनैतिक प्रेम संबंधातुन महिलेच्या ञासाला कंटाळुन खून केल्याची कबुली दिली हा खून त्याने त्याच्या दोन साथीदारांसह खदानीच्या बाजूला नेऊन गळा आवळुन डोक्यात दगड घालून खुन केला व मृत महिलेला खाणीमध्ये फेकून देऊन पसार झाले.

26 सप्टेंबर 2020 रोजी आरोपी प्रशांत गायकवाड याने महिलेला जबरदस्तीने घरातून घेऊन गेला अशी फिर्याद महिलेच्या बहिणीने दिली. देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. 681/2020 भा.द.वि.क 363 नुसार गुन्हा दाखल केला होता त्यानुसार तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांनी तपासाची सूत्र हलवली असता जगताप यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत आरोपी प्रशांत गायकवाड हा रहाटणी मध्ये बायकोला भेटावयास जाणार आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार वरीष्ट पोलिस निरिक्षक कल्याणकर यांना कळवुन त्यांचा मार्गदर्शना खाली,जगताप व पो.शि. दिपक शिरसाट,पो.शि.संकेत घारे यांनी आशीर्वाद कॉलनी राहटणी मधून आरोपी प्रशांत गायकवाड यास सापळा रचुन राञी 3 वा.(दि.26) ताब्यात घेतले व आरोपीला खाक्या दाखवताच विचारपूस केली असता आरोपी प्रशांत गायकवाड याच्यापासून मयत महिला सहा महिन्याचे मुलगी आहेत या सहा महिन्याच्या मुलीचा आयुष्याचा प्रश्न आहे तो सोडव हा तगादा सदर आरोपी प्रशांत गायकवाड कडे मयत प्रिया शीलामन चव्हाण हिने तगादा लावला व त्यावरून त्यांचे भांडण होते तसेच मयत महिलेचा भाऊ याच्यावर निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत 302 चा गुन्हा दाखल आहे त्याला सोडवण्यासाठी आरोपी कडे मागणी केली असता त्या दोघांमध्ये मोठे भांडण झाले त्यावर मयत महिला आरोपीच्या घरी गेली असता आरोपीच्या घरी जाऊन मयत महिलेने भांडणं केली त्याचा राग डोक्यात धरून आरोपी प्रशांत सुर्यकांत गायकवाड यांने त्याचे साथीदार अरोपी विक्रम राजाराम रोकडे,अरोपी अभिजीत दंडे (सर्व राहणार किवळे गाव वस्ती) अशा दोन साथीदारांचा समवेत 25 सप्टेंबर रोजी मृत महिला प्रिया हिला रात्री आदर्शनगर खादाणीच्या जवळ नेऊन तिचा गळा आवळून डोक्यात दगड घालून खून करून खाणीमध्ये मध्ये मृतदेह फेकून दिला सदर मुख्य आरोपी प्रशांत गायकवाड यांने आज सकाळी पोलिसांना घटनास्थळी नेऊन मृतदेह दाखवला सदर घटनास्थळी देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर तसेच क्राईम पोलीस निरीक्षक गोफणे व पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप,महिला पो.उपनिरिक्षक बोरकर व देहुरोड पोलिस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून सदर मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला. आरोपींवर भा.द.वि.क 364, 302,201,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक कल्याणकर यांनी पञकारांना दिली असून पुढील तपास देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलीस करत आहेत.

Previous articleदिक्षाभुमीवरील धम्मचक्र प्रर्वतन दिनाचा सोहळा रद्द
Next articleH-CNG च्या वापराला परवानगी देणारी अधिसूचना जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 17 =