Home ताज्या बातम्या बावेजा पती-पत्नीचा अनोखा उपक्रम; लॉकडाऊन काळात स्वखर्चातूनवाटली २० हजार सॅनिटरी पॅड

बावेजा पती-पत्नीचा अनोखा उपक्रम; लॉकडाऊन काळात स्वखर्चातूनवाटली २० हजार सॅनिटरी पॅड

47
0

पिंपरी,दि. 22 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता या संसर्गाची साखळी मोडून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक लॉकडाऊन (संचार बंदी) घोषीत करण्यात आला. यामुळे अतिआवश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतरिक्त सर्व आस्थापना पूर्णपणे बंद होत्या. यामुळे अनेक गरीब नागरिकांना विविध गोष्टींचा सामना करावा लागला.या दरम्यान बावेजा कुटुंबातील जोडपे योगेशसिंह बावेजा आणि गुरप्रीतकौर बावेजा या पती-पत्नीला एक गंभीर बाब लक्षात आली कि, या लॉकडाऊन काळात समाजतील बऱ्याचशा गरीब कुटुंबातील महिला आणि मुलींना त्यांच्या महावारिच्या काळात सॅनिटरी पॅड उपलब्ध होत नाहीत. ज्यामुळे त्या महावारिच्या काळात कपडा वापरतील आणि नाना तरेच्या आजारांना निमंत्रण देतील.यावर योगेश आणि गुरप्रीत या दोघांनी कशाचीही अपेक्षा न करता “निस्वार्थ सेवा” या हेतूने झोपडपट्टीतील मजुर, गरीब तसेच बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना स्वखर्चातून मोफत सॅनिटरी पॅड देण्याचे ठरवले. ज्यावेळी नागरिक कोरोनाला घाबरुन घरात बसले होते. या श्रमिक जोडप्याने सामाजिक भान राखून पुणे, पिंपरी-चिंचवड येथील गरीब महिला आणि मुलींना २० हजारांहून अधिक मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले. तसेच महिलांना सॅनिटरी पॅड वापरण्याचे म्हत्व पटवून सांगितले.योगेश आणि गुरप्रीत हे दोघे ही एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. या पुढे देखील ते हे मदत कार्य असेच सुरु ठेवणार आहेत. फुल नाही फुलाची पाखळी म्हणून त्यांनी त्यांच्या परिने केलेली महिलांसाठीचे हे मदत कार्य खर्‍या अर्थाने कौतुकास्पद आहे.

Previous articleक्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेला त्रास देणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक
Next articleपुणे-आंबेगाव मध्ये मास्क का लावला नाही अशी विचारणा करणाऱ्या सोसायटी चेअरमनला बेदम मारहाण ; तिघांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 + eighteen =