Home ताज्या बातम्या देहुरोड पोलीस स्टेशन आयोजीत पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समिती मार्फत अरोग्य शिबीर...

देहुरोड पोलीस स्टेशन आयोजीत पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समिती मार्फत अरोग्य शिबीर व हळदी कुंकुवचा कार्यक्रम करण्यात आला

0

देहुरोड,दि.28 जानेवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
संक्रांत निमित्याने पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समिती मार्फत हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तसेच एक आगळेवेगळे हळदीकुंकू कार्यक्रमांचे आयोजन मा पोलीस आयुक्त श्री संदीप बिष्णोई साो यांचे निदर्शना नुसार पोलीस ठाणे देहुरोड ने दि.२८ जानेवारी २०२० रोजी आयोजीत करेण्यात आले होते.
“वसा हळदी कुंकवाचा आणी वाण आरोग्याचे “हे घोषवाक्य करीत देहुरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनिष कल्याणकर व पोलीस ठाण्याचे महीला दक्षता समितीने संयुक्त पणे हळदी कुकवाचा कार्यक्रम घेत “वाण ” म्हणुन येना-या प्रत्येक महीलेची आरोग्य विषयक तपासणी अगदी मोफत स्वरूपात करून दिली त्यात स्तनाचा कर्क रोग निदान,गर्भाशयाचा रोग निदान ,नेत्र तपासणी व मोफत चेश्मे वाटप,मोफत मोतीबंदु तपासणी व मोफत शस्त्रक्रीया,रक्तातील साखर , हीमोग्लोबीन,रक्तदाब चाचणी इत्यादी तपासणी हळदी कुंकवाला येणा-या
महीलांच्या करण्यात आल्या त्यात १५२ महिलांनी शुगर ,रक्तदाब तसेच हीमोग्लोबीनची तपासणी केली तर १०१ महिलांनी कर्करोगावरील निदान तपासणी केली तसेच १२७ महीलांणी नेत्र तपासणी केली महीलांसाठी अतिशय उपयुक्त अशा आरोग्य शिबीराचे “वाण ” मिळाल्या बाबत देहुरोड पोलीस स्टेशनच्या परीसरात कौतुक होत आहे.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन देहुरोड कॅन्टोमेन्ट बोर्डचे उपाध्यक्ष श्री रघुविर शेलार यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी देहुगावच्या सरपंच सौ पुनम विशाल काळेखे हया होत्या तर सजंय नाईक पाटील सहा पोलीस आयुक्त देहुरोड यांचे सह सभापती प.स सौ हंमाताई कांतीलाल काळोखे ,नगरसेविका सौ सुमन ताई नेटके ,सौ पोर्णिमा सोनवणे,कु प्रज्ञा खानोलकर,नगरसेवक श्री बाळासाहेब ओव्हाळ ,पंकज भालेकर कॅन्टोमेन्टचे नगरसेवक श्री विशाल खंडेलवाल,श्री राहुल बालघरे ,श्री हाजिमलंग मारीमुत्तु ,श्री गोपाळराव तंतरपाळे तसेच समाज सेवक विशाल काळोखे,अॅड. दाभोळे,विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थीतीत विकासनगर येथे हळदी कुंक कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्या करीता मा अप्पर पोलीस आयुक्त श्री पोकळे ,मा पोलीस उपआयुक्त श्री विनायक ढाकणे यांचे मार्गदर्शना खाली देहुरोड पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीच्या महीला पोलीस उपनिरीक्षक,
सौ छाया बोरकर ,सौ शुभांगी वानखेडे ,सौ पुष्पाताई शेळके,सौ निम्रला चव्हान,सौ संजिवणी चोपडे,सारीखा पारस मुथ्था,सौ वैशाली अवघडे,सौ ज्योती वैरागर , सौ ,सारिका सोनवणे,सौ बॉबी डीक्का,सौ शिला भोडवे,सौ पोर्णिमा पालेकर,सौ रत्नमाला करांडे,सौ अनिता गरूड,सौ सपना बनसोडे तसेच देहुरोड पोलीस स्टेशन कडील- पो हवा नवले,पो ना राजेद्र कुरणे,पोना/ भांगे, मपाकॉ/सयद,मपोकॉ/ सरसे, मपोकॉ/ गवारी,मपोकाँ/ शिंदे, मपोका/ धोडगे यांनी मेहनत घेत कार्यक्रम
यशस्वीपणे पार पाडला

Previous articleCAA,NRC विरोधात वंचीतच्या महाराष्र्ट बंद ला देहुरोड शहरातुन प्रतिसाद
Next articleरावण टोळीतील सदस्य सागर परिट याला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह देहुरोड पोलीसांनी केले जेरबंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine − seven =