Home ताज्या बातम्या एमआयएम कडुन चिंचवड विधान सभेची उमेदवारी जावेद शेख यांना होणार निश्चित

एमआयएम कडुन चिंचवड विधान सभेची उमेदवारी जावेद शेख यांना होणार निश्चित

0

चिंचवड,दि.१४ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-महाराष्र्टातील विधान सभा निवडणुकीचे वातावरण सुरु असताना अनेक पक्षाच्या मुलाखती सुरु असताना,
चिंचवड विधानसभा इच्छुक उमेदवार जावेद शेख यांनी आज औरंगाबाद येथे एम आय एम चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात मुलाखत दिली हे मुलाखत सकारात्मक झाली असून चिंचवड विधानसभेतून एकमेव उमेदवार असल्याने जावेद शेख यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, त्यामुळे चिंचवड विधानसभेत यांदा एमआयएमच्या रूपाने मुस्लिम चेहरा झळकणार चिंचवड विधानसभा ही दिग्गजांची विधानसभा मानले जाते या विधानसभेत अनेकांनी प्रयत्न करून हाती अपयश मिळवले पण मात्र यावर्षी हि विधानसभा मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे यावेळेस अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी चिंचवड विधानसभा मधून जावेद शेख हे एम आय एम कडून निवडणूक लढवणार आहेत. चिंचवड विधानसभा हा लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला असून या विधानसभेत सर्व महाराष्ट्राचे लक्ष यंदा लागून राहणार आहे येत्या निवडणुकीत चिंचवड विधानसभेत रंगत रंगणार का हे चित्र पाहण्यास मिळेल जावेद शेख यांनी मुलाखत देताना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अखिल मुजावर उपस्थित होते त्यामुळे प्रदेशाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष या समवेत सकारात्मक चर्चा झाल्याने जावेद शेख यांनी निवडणूक रिंगणात निवडणूक लढण्यासाठी कंबर कसली असून प्रभागांमध्ये मतदारसंघां मध्ये भेटी सुरु केल्या असुन पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय गुरु आझमभाई पानसरे यांच्या अनेक समर्थक चिंचवड विधानसभेत राहतात त्यामुळे जावेद शेख यांना त्याचा फायदा मिळेल का हे येणाऱ्या आगामी निवडणुकीत पाहायला मिळेल

Previous articleराष्ट्रवादीचे छ.उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
Next articleमुख्यमंञ्यांच्या टीकेला संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे घोषणा देत प्रतिउत्तर एकच वादा अजितदादा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 4 =