Home ताज्या बातम्या मुस्लिम महिला (विवाहविषयक अधिकार संरक्षण) विधेयक 2019 संसदेत संमत, मुस्लिम महिलांची तिहेरी...

मुस्लिम महिला (विवाहविषयक अधिकार संरक्षण) विधेयक 2019 संसदेत संमत, मुस्लिम महिलांची तिहेरी तलाकच्या अभिशापातून मुक्तता :- अमित शहा

0

नवी दिल्ली, 30 जुलै 2019 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-

मुस्लिम महिला (विवाहविषयक अधिकार संरक्षण) विधेयक 2019  आज संसदेत मंजूर झाले.

या ऐतिहासिक निर्णयाविषयी समाधान व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तिहेरी तलाक प्रथा बंद करण्याचे अभिवचन पूर्ण केल्याबद्दल शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

तसेच हा महत्वाचा कायदा संमत झाल्याबद्दल त्यांनी मुस्लिम महिलांचेही अभिनंदन केले. देशभरातील मुस्लिम भगिनींना आज तिहेरी तलाकच्या अभिशापातून मुक्ती मिळाली आहे, त्याबद्दल, मी त्यांचे अभिनंदन करतो.

महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. या विधेयकामुळे मुस्लिम महिलांची प्रतिष्ठा जपली जाईल, मुस्लिम महिलांच्या आयुष्यात या कायद्यामुळे आशा आणि सन्मानाचे नवे युग सुरु झाले आहे, असे अमित शाह म्हणाले. आता त्यांच्यासाठी संधींची अनेक दारे खुली झाली असून नव्या भारताच्या निर्मितीत त्या महत्वाचे योगदान देऊ शकतील.

“भारतीय लोकशाहीसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या ऐतिहासिक विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचे मी आभार मानतो” असे सांगत अमित शाह यांनी सर्व संसद सदस्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 1 =