Home ताज्या बातम्या देहूरोड कॅन्टोंन्मेट भाजपचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्या वर गोळीबार

देहूरोड कॅन्टोंन्मेट भाजपचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्या वर गोळीबार

96
1

देहूरोड (१३जुन २०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपाचे नगरसेवक,देहुरोड कॅन्टोन्मेट बोर्डचे मा.उपाध्यक्ष देहुरोड शहरातील नामांकीत व्यापारी जिंक्की उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर दोन अज्ञतानी केला गोळीबार,विशाल खंडेलवाल यांच्याशी बोलण्याच्या केला त्यानी प्रयत्न व त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे जाणवताच विशाल खंडेलवाल यांनी सावधगिरी बाळगत तिथुन पळ काढला,पण खंडेलवाल यांच्या दिशेने हल्लेखोरांनी एक गोळी झाडली,गोळी त्यांना लागली नसली तरी जीव वाचवण्यासाठी पळताना टुव्हिलर ला धडक लागल्यान ते खाली पडले त्यामुळे खंडेलवाल यांच्या पायाला दुखापत झाली असुन त्यांना सोमाटणा येतील पवाना हाॅस्पीटल मध्ये उपचारासाठी भरती केले आहे,या घटनेमुळे देहूरोड परिसरात खळबळ उडाली असून यामध्ये खंडेलवाल भयभीत झाले आहेत.खंडेलवाल यांच्यावर कोणत्या कारणामुळे हल्ला झाला हे अद्याप समजू शकले नाही.
हा प्रकार आज (गुरुवार) सांयकाळी घडला आहे. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून पोलिसांनी जवळील परिसरातील सीसीटीव्ही तपासले आहे.त्यात काही अद्याप सापडले नसुन पुढील तपास देहुरोड पोलिस करत आहेत.

Previous articleइंद्रायणी इंग्लिश स्कूलचा SSC बोर्ड चा निकाल १००%
Next articleपिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांचा व ठेकेदारांचा भोंगळ कारभार मिना काॅलनीत एक वर्ष उलटले तरी नवीन पाईप लाईन टाकुण सुध्दा घरातील नळांना कनेक्शन अजुन जोडलेले नाही

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × two =