Home ताज्या बातम्या *पाण्यासाठी नागरीकांची भटकंती* *लोकप्रतिनिधी ,प्रशासन सुस्त*

*पाण्यासाठी नागरीकांची भटकंती* *लोकप्रतिनिधी ,प्रशासन सुस्त*

175
0

तेल्हारा-(प्रजेचा विकास-आनंद बोदडे)*पाण्यासाठी नागरीकांची भटकंती* *लोकप्रतिनिधी ,प्रशासन सुस्त* तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील पाणीपुरवठा पाच दिवसापासुन बंद नागरीकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. बेलखेड ग्राम पंचायतीचे विद्युत कनेक्शन महावितरण कंपनीने कापल्यामुळे पाच दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. गावातील शेकडो नागरीकांचे लक्ष आता सत्ताधारी हाताकडे लागलेले असतांना सामाजिक भावनेतून अॅड श्रीकांत तायडे यांनी शनिवारी दोन वेळा तेल्हारा तहसिलदार डाँ.संतोष येवलीकर यांचे सोबत चर्चा केली तहसीलदार यांनी तेल्हारा गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून एक दोन दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. सोबतच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कोहाळ यांचे सोबत चर्चा करून सामान्य गावकर्‍यांसाठी मार्ग काढण्याची मागणी अॅड तायडे यांनी केली आहे .गावातील प्रशासनाच्या कृपेने चालनारे अवैद्य नळ कनेक्शनची समस्याही दबक्या आवाजात कारणीभूत आहे असे गावकरी सांगतात.

Previous articleसंंकल्प वधु वर सुचक केंंद्र पुणे आयोजीत रविवार,दि- १६ सप्टेंंबर २०१८ रोजी वधु वर व पालकांंचा ५५वा भव्य स्नेह मेळावा
Next article*मुलीची छेड काढण-या टवाळखोरांच्या मुसक्या तेल्हारा पोलीसांनी आवळल्या**

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − ten =