Home महाराष्ट्र आशिष शेलार ‘ऑपरेशन कमळ’साठी स्पेशल चार्टर्ड विमानाने बंगळुरुला रवाना

आशिष शेलार ‘ऑपरेशन कमळ’साठी स्पेशल चार्टर्ड विमानाने बंगळुरुला रवाना

0
Prajecha Vikas

मुंबई: आज कर्नाटक विधानसभेत भाजपचा कस लागणार असून मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आज दुपारी ४ वा बहुमत सिद्ध करायचे आहे. राज्यपालांनी दिलेली १५ दिवसांची मुदत अमान्य करत, आज दुपारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

आज कर्नाटकात सत्ता स्थापनेच्या निर्णायक टप्प्याला ‘ऑपरेशन कमळ’ असे नाव दिले आहे. या स्पेशल ऑपरेशन टीममध्ये पक्ष श्रेष्टींकडून महाराष्ट्रातून आमदार आशिष शेलार यांना पाचारण करण्यात आले आहे. आशिष शेलार सत्तेची जुळवाजुळव करण्यासाठी आज सकाळी बंगळुरूच्या दिशेने स्पेशल चार्टर्ड विमानाने रवाना झाले आहेत. आशिष शेलार यांच्याकडे कर्नाटक निवडणुकीत ४७ मतदारसंघाची जबाबदारी होती. आशिष शेलार निवडणूक काळात बंगळुरु ग्रामीण आणि शहर या भागात तळ ठोकून होते. त्यामुळे भाजपने कर्नाटकच्या लढाईसाठी महाराष्ट्रातून कुमक पाठवली आहे.

Previous articleदेशातील ५६ टक्के लोकांचा मोदी सरकारवर विश्वास – सर्वेक्षण
Next articleपोलिसांनी शिवसेनेच्या ‘हिंदू शक्ती’ मोर्चास परवानगी नाकारली
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 + 10 =