Home ताज्या बातम्या अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीकडून हकालपट्टी

अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीकडून हकालपट्टी

0

मुंबई,दि.23नोव्हेंबर2019(प्रपजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राज्यात मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची ही हकालपट्टी करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचे पत्र देत पाठिंबा दिला होता.त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, अशा आशयाचे ट्विट शरद पवार यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीने अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते.आता अजित पवार किती आमदार आपल्यासोबत नेणार याचीही उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − eight =