Home ताज्या बातम्या प्रभाग क्र.१६ मध्ये खड्डेमुक्त रस्त्यांसाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीमला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग क्र.१६ मध्ये खड्डेमुक्त रस्त्यांसाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीमला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

मामुर्डी,दि.२५ ऑगस्ट २०२५ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी ):-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत विशेषतः मासुळकर सिटी – सिद्धार्थ नगर – मामुर्डी रस्ता या मुख्य मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यामुळे दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक व वाहनचालकांना अपघाताचा धोका, वाहनांचे नुकसान व आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागत आहे. असा जीव घेणा प्रवास नागरिक करत आहेत.

या गंभीर समस्येच्या निवारणासाठी “खड्डेमुक्त रस्ते” या मागणीसाठी राष्ट्रवादीचे बापू कातळे यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिला असून, शेकडो नागरिकांनी आपली स्वाक्षरी करून खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आवाज बुलंद केला आहे.

या मोहिमेमार्फत नागरिकांची एकजूट व प्रखर पाठिंबा दिसून आला असून, ही मागणी तातडीने मान्य करून रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. प्रशासनाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून प्रशासनाचा निषेध नोंदवला जात आहे. याची तरी दखल घेऊन प्रशासनाने त्वरित रस्त्याचे काम करावे अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.

“Smooth Roads – Safe Rides” या घोषवाक्याखाली सुरू असलेल्या या आंदोलनात्मक उपक्रमाच्या माध्यमातून, रस्त्यांचे तात्काळ व कायमस्वरूपी डांबरीकरण होऊन नागरिकांना दिलासा मिळावा, हा उद्देश आहे बापु कातळे( उपाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, पिंपरी चिंचवड शहर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen + nine =