Home ताज्या बातम्या रहाटणीतील SNBP स्कूल चे कराटे मध्ये घवघवीत यश….!

रहाटणीतील SNBP स्कूल चे कराटे मध्ये घवघवीत यश….!

0

पिंपरी,दि.२३ ऑगस्ट २०२५( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवडच्या रहाटणी मधल्या एस एन बी पी स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कराटे इंडिपेंडंस कप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये रहाटणी आणि पिंपळे सौदागर मधील विविध कराटे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विविध वयोगटांच्या स्पर्धांचे आयोजन एस एन बी पी स्कूलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सर्वच कराटे खेळाडूंनी दमदार कामगिरी करत कौशल्य दाखविले. या स्पर्धांमध्ये एस एन बीपी स्कूलने घवघवीत यश मिळवत सर्वाधिक सुवर्णपदके जिंकण्याचा बहुमान मिळवला. या स्पर्धेसाठी एसएनबीपी स्कूलचे अध्यक्ष डी के भोसले आणि जयश्री व्यंकटरमण यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धांचे शत्रुघ्न काटे स्पोर्ट्स क्लब कडून आयोजन करण्यात आले. एसएनबीपी स्कूल मधील सुमित थापा यांनी स्पर्धांच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. खेळाडूंनी मिळवलेल्या घवघवीत यशा बद्दल एस एन बीपी स्कूल कडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − six =