Home ताज्या बातम्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे बाळासाहेब ओव्हाळ हे घरोघरी पोहोचण्यात यशस्वी

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे बाळासाहेब ओव्हाळ हे घरोघरी पोहोचण्यात यशस्वी

0

पिंपरी,दि.०८ नोव्हेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अर्थात परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. मतदार संघातील दापोडी परिसरातील घरोघरी संपर्क साधून आणि तेथील मतदारांशी संवाद साधून बाळासाहेब ओव्हाळ हे घरोघरी पोहोचण्यात यशस्वी होत आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रचारात तर त्यांनी मुसंडी मारली आहे. ओव्हाळ यांचे कार्यकर्ते पिंपरी मतदार संघात प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पदयात्रेद्वारे अनेक ठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे पिंपरी विधानसभे मधून त्यांचा विजय हा प्रचंड मताधिक्याने होईल असे सांगण्यात येत आहे . ‘आरंभ है प्रचंड’ असे म्हणतच त्यांचे अनेक कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + twelve =