वाकड, ताथवडे,दि. ७ नोव्हेंबर २०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- वाकड-ताथवडे परिसरातील शनी मंदिर रोड आणि पनाश सोसायटी ते भूमकर चौक या मार्गांवरील वाढते वायू प्रदूषण आणि अवजड वाहनांच्या अनियंत्रित वाहतुकीमुळे नागरिकांचा संताप उसळला आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाकड-ताथवडे हौसिंग सोसायटी फोरम तर्फे हिंजवडी पोलिस स्टेशनचे मा. वरीष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.या वेळी
प्रशांत काटे , इंगळे साहेब , पाटील , केयूर मिश्रा , बंडोळे साहेब , ऍड विकास शिंदे साहेब उपस्थित होते.
या फोरममध्ये ३० पेक्षा अधिक गृहनिर्माण सोसायट्यांचे रहिवासी सहभागी असून, त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या सिमेंट मिक्सर, डंपर आणि RMC प्लॅन्टमुळे वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीवर गेले आहे. रस्त्यांवरील सिमेंटची धूळ, ट्रॅफिक जॅम आणि अपघातांचा धोका यामुळे नागरिकांचा रोजचा जीवनमान त्रस्त झाला आहे.
🏗️ नियम धाब्यावर, धूळच धूळ!
निवेदनात म्हटले आहे की, सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असतानाही ही वाहतूक निर्बंध न पाळता सुरू आहे. त्यामुळे परिसरातील शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि कामावर जाणारे लोक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
“प्रशासनाने तातडीने या वाहतुकीवर आळा घालावा आणि बंदी असलेल्या वेळेत वाहतूक पोलिस नेमावेत,” अशी मागणी सोसायटी फोरमने केली आहे.
🏘️ या ३० पेक्षा जास्त सोसायट्यांचा एकत्रित आवाज
एलिट होम्स, DNV एल्व्हिरा, मोंटव्हर्ट सॉनेट, स्वप्नलोक Itrend Life, फॉर्च्युन 108, पनाश, सुख़वाणी स्कायलाइन, रामा मेट्रो, आयशा फूटप्रिंट्स, कोहिनूर कोर्टयार्ड वन, सेर्रा बेला अॅकॉर्न पार्क, इथॉस, कुमार पिकॅडिली, सेंतोसा पर्ल, कॅरिन सुफ़ल, विजन ACE, यशविन, ब्लू मॉंट, त्रिनिटी ग्रीन्स, मिलेनियम अॅक्रोपोलिस इत्यादी सोसायट्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.
🚶♀️ १५ नोव्हेंबरला मोर्चाची चेतावणी!
फोरमने स्पष्ट केले आहे की, “प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेले नाहीत.” त्यामुळे १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
🗣️ “प्रशासनाने जागे व्हावे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू!”
फोरमचे पदाधिकारी म्हणाले,
“प्रदूषणामुळे मुलांना श्वास घ्यायलाही त्रास होतोय, घरातही धूळ साचते. रोज सकाळ-संध्याकाळ मिक्सर आणि डंपर धावत असतात. आता पुरे झाले, आम्हाला शुद्ध हवा हवी आहे!
सोसायटी धारक म्हणतात…
विकासासाठी होणारे बांधकाम स्वागतार्ह आहे, परंतु नागरिकांच्या आरोग्याचा बळी देऊन नव्हे. वाकड-ताथवडे परिसरातील या गंभीर समस्येवर संबंधित प्रशासनाने त्वरित पावले उचलून ठोस कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
📢 “प्रजेचा विकास” नागरिकांच्या प्रत्येक आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आहे.



