पुणे,दि.१७ सप्टेंबर २०२५( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- लॉर्ड बुद्धा टी.व्ही. आणि आमदार सिद्धार्थभाऊ खरात मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनजागृती अभियान अंतर्गत पुण्यात भव्य राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत “आंबेडकरी चळवळ आणि बौद्धगयेचा प्रश्न – विस्मरणातून पुनर्जागरणाकडे” या विषयावर विचारमंथन होणार असून विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
📌 प्रमुख वक्ते – भन्ते धम्मानंद, भन्ते पय्यारक्खीत, प्रा. प्रकाश पवार, मा. शैलेंद्र चव्हाण, मा. सुदीप गायकवाड, मा. राहुल डंबाळे, ऍड. अश्विनी कांबळे व सुभाष कांबळे.
📍 स्थळ – त्रिरत्न बुद्ध विहार, महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, समता नगर, येरवडा, पुणे – ६
🕕 वेळ – सायं. ६:३० वाजता
📺 थेट प्रक्षेपण – लॉर्ड बुद्धा टी.व्ही.
👉 पुणे प्रतिनिधी लॉर्ड बुद्धा टी.व्ही. बाळासाहेब बेंगळे यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



