पिंपरी चिंचवड,दि.०४ सप्टेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. नगरसेवक व सर्वांच्या मनात आपुलकी जपणारे मोरेश्वर भाऊ भोंडवे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६, १७ तसेच इतर भागातील गणेश मंडळे व सोसायट्यांमध्ये भेट देऊन गणरायाच्या आरतीत सहभागी होत भक्तांचा उत्साह वाढवला.
गणेशोत्सव हा सामाजिक ऐक्य व आनंदाचा सण असल्याचे भाऊ भोंडवे यांनी यावेळी सांगितले. प्रभागातील मंडळे, सोसायट्या तसेच नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. भाऊंच्या उपस्थितीने गणेश मंडपांमध्ये भक्तीभावाबरोबरच आपुलकीचा माहोल निर्माण झाला होता.
नागरिकांनी सांगितले की, “भाऊ म्हणजे आमचेच माणूस, गरज असो वा सण, ते नेहमी लोकांसोबत उभे असतात. त्यामुळेच लोक त्यांना आवडीने बोलावतात.”

मोरेश्वरभाऊ भोंडवे यांचा हा गणेशोत्सवातील सहभाग केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता, समाजातील आपुलकी, बांधिलकी आणि लोकसंपर्क अधिक घट्ट करणारा ठरला आहे.
“भाऊंची आरतीत उपस्थिती – नागरिकांच्या उत्साहाला उभारी”
“गणेशोत्सवात सोसायटी, मंडळे, नागरिकांनी आवर्जून बोलावलेले आपुलकीचे नेते – मोरेश्वर भाऊ भोंडवे”



