Home ताज्या बातम्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पुणे,दि.०३ सप्टेंबर २०२५ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- रोटरी क्लब, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन यांच्या वतीने पीसीईटी शैक्षणिक संकुलात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्यनगर व रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट यांचे सहकार्य लाभले, तर दिंभा फाउंडेशनने कार्यक्रमाचे समन्वयन केले.

या शिबिरात संकुलातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या या शिबिरात दात्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

शिबिराचे आयोजन यश नेहरकर, अजित मिटकरी, रुतुजा थिटे, राधिका मंत्री, मंथन जाधव व आदित्य जगदाळे (एस. बी. पाटील सीओएडी रोट्रॅक्ट क्लब) यांनी केले. प्राचार्या डॉ. स्मिता सुर्यवंशी, आर्किटेक्ट शिल्पा पाटील व आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर व कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + 16 =

error: Content is protected !!
Exit mobile version