पिंपरी, दि.०३ सप्टेंबर २०२५(प्रजेचा विकास ऑनलाइन न्यूज):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नती प्रक्रिया अखेर मार्गी लागली असून, एकूण ३० कनिष्ठ अभियंत्यांना ‘उपअभियंता (स्थापत्य)’ या पदावर तात्पुरत्या स्वरूपात बढती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजातील गती वाढण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार,श्रेणीत ही बढती देण्यात आली आहे. पदोन्नती समितीची सभा दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर २ सप्टेंबर २०२५ रोजी आयुक्त शेखर सिंह यांच्या सहीने अधिकृत आदेश काढण्यात आला.
📌 पदोन्नत अधिकाऱ्यांची यादी :
वैद्य संदीप रमेशराव
स्वामी मनाली दिनेश
खरटमोल मनोज विठ्ठल
इदे अनिल किसन
पाटील राहुल श्रीकृष्ण
कानडे अमोल विनायक
धेंडे पंकज सुधाकर
रोकडे जयवंत बबन
मोरमारे शरद विष्णु
गाडे प्रिती केशव
मोरे वंदना भगवानराव
जोशी अतुल सहादु
गेंगजे हृषिकेश बबनराव
पाडवी संदिप गोपाळ
दाते निलेश सोमा
बगली सदाशिव अप्पासाहेब
मोरे अशोक श्रावण
पावरा साकेत रतिलाल
शेमले रघुनाथ हिरामण
जन्नु राहुल तिपण्णा
लोहकरे संदिप जीवन
बंडगर संजय भिवा
भोईर अनिल नटू
बेळगांवकर सुनिल सिध्दप्पा
कलाल इम्रान कयुम
देवरे महेंद्र केदारेश्वर
मोरे प्रताप किशनराव
कदम वर्षा सागर
गनबोटे अभिजीत प्रकाश
भोसले सन्मान सदाशिव (दिव्यांग)
⚖️ अटी व शर्ती :
ही पदोन्नती फक्त तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली आहे.
न्यायालयीन प्रलंबित खटल्यांमुळे अंतिम निर्णय न्यायालयाच्या अधीन राहणार आहे.
कोणत्याही अधिकाऱ्याला कायमस्वरूपी नियुक्तीचा हक्क या पदोन्नतीमुळे प्राप्त होणार नाही.
सेवाज्येष्ठतेच्या वादांवर अंतिम निर्णय न्यायालयीन आदेशांवर अवलंबून असेल.
या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पदोन्नतीची प्रक्रिया मार्गी लागली असली तरीही, प्रकरण न्यायालयीन खटल्यांशी निगडित असल्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप अंतिम स्थैर्य मिळालेले नाही. मात्र, महापालिकेच्या विविध विभागांना आता कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ मिळणार आहे.
👉 हा निर्णय महापालिकेच्या दैनंदिन कामकाजाला दिलासा देणारा ठरणार आहे.



