किवळेगाव,दि.२९ ऑगस्ट२०२५ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- किवळेगावातील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाला स्थानिक महिला वर्गाकडून तब्बल १.५ किलो वजनाचा चांदीचा हार भेट स्वरूपात अर्पण करण्यात आला. श्रद्धा, प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक ठरलेली ही भेट मंडळाच्या सामाजिक व धार्मिक कार्याला नवी ऊर्जा देणारी ठरली आहे.
मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रम तसेच गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जपली आहे. या सर्व कार्याची दखल घेत महिलांनी हार अर्पण करून मंडळाचा सन्मान केला.
या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांच्या या अनमोल भेटीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच “आगामी काळात अधिक जोमाने सामाजिक व सांस्कृतिक कार्य करणार” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
→ श्रद्धा, विश्वास आणि सामाजिक कार्य यांचा संगम म्हणजेच सिद्धिविनायक मित्र मंडळाचा हा सोनेरी क्षण ठरला!



