नाशिक,दि.३१ जुलै २०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल NIA कोर्टाने दिला आहे. विशेष एनआयए न्यायालय साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सात आरोपीना या प्रकरणात निर्दोष मुक्त केले आहे. १७ वर्षांनंतर येणाऱ्या या निकालाची सर्वांनाचे लक्ष लागले होते. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल NIA कोर्टाने दिला आहे. विशेष एनआयए न्यायालय साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सात आरोपीना या प्रकरणात पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे. १७ वर्षांनंतर येणाऱ्या या निकालाची सर्वांनाचे लक्ष लागले होते. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त), मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी, अजय राहीकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे आणि सुधाकर चतुर्वेदी हे या प्रकरणात आरोपी होते. त्यावर आज न्यायालयाने दिला आहे.
एनआयएच्या आधी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (ATS) ने केला होता. त्यानंतर २०११ मध्ये हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) वर्ग करण्यात आले. तपासादरम्यान काही आरोपींवरच्या UAPA (दहशतवादविरोधी कायदा) अंतर्गत असलेल्या आरोपातून सुटका झाली, तर काही गंभीर आरोप कायम ठेवण्यात आले होते. यावर आज न्यायालयाने निर्णय देत सर्व आरोपींना न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त केल आहे.



