किवळे,दि.२४ जुलै २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- अतिक्रमण विभाग तोंड बघून कारवाई करते का? धन दांडग्यांवर कारवाई करायला अतिक्रमण विभाग घाबरतो का? अशा अनेक प्रश्न मांडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहर संघटक विनोद भंडारी यांनी ब प्रभाग अतिक्रमण विभागाचा निषेध नोंदवत पत्रकारांशी संवाद साधला.जाहीर निषेध जाहीर निषेध सर्वसामान्याला एक न्याय व मोठ्या लोकांना वेगळा न्याय का? प्रभाग क्रमांक 16 किवळे रावेत मधील सर्व नागरिकांना लक्षात घ्या आपल्या प्रभागामध्ये काय चाललंय आपण याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.
प्रभागांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील लोक कष्ट करुन एकएक पै जोडुन घर बांधत आहे. त्याच्या विरोधामध्ये महानगरपालिका कारवाई करत आहे . पण मोठे बलाढ्य दिगज बिल्डर अनधिकृत पद्धतीने SRA ट्रांजिस्टर कॅम्प काम सुरू आहे. त्याच्यावरती कुठली कारवाई केली जात नाही. दुसरे ठिकाणी आरक्षित भूखंड मध्ये कचरा डेपो च काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे.
पण त्याच वेळेस मुकाई चौकातील महानगरपालिका हॉस्पिटल साठी आरक्षित भूखंडावरती कुठलाही प्रकारची अतिक्रमण कारवाई किंवा काम करत ना दिसत नाही. हा भेदभाव कोणाच्या सांगण्यावरून
महानगरपालिकेचे कर्मचारी करत आहेत. त्याच्या विरोधात आपण सर्वसामान्य नागरिकांनि एक झुटीने आवाज उचलणे गरजेचे आहे.
महानगरपालिकेचा मी विनोद भंडारी निषेध करतो.
वेळप्रसंगी जर ह्या लोकांनी लक्ष नाही दिले. आपल्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यांच्या विरोधात आंदोलन उभं करायला लागेल. माझे सर्व आजी माझी भावी नगरसेवक नगरसेविकांना
सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना आव्हान आहे,की आपण या गोष्टीची दखल घेऊन आपला प्रभाग मध्ये विकास कामे करण्यासाठी एकजूट येण्याची गरज आहे.सर्वानी हे लक्षात घेतले पाहिजे असे अहवान भंडारी यांनी केले.



