वाकड,दि.१५ जुलै २०२५(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- मौजे किवळे येथील सर्वे नंबर ७३/२ या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन च्या अनुषंगाने एस आर ए काळा खडक वाकड येथील नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी,ट्रांजिस्ट कॅम्प बांधण्याची तात्पुरती परवानगी महानगरपालिकेने दिली असून त्या ठिकाणी बहिण हिस्यासाठी चाललेल्या वादामुळे काळाखडक एस आर ए मधील नागरिक किवळे येथील ट्रांजिस्ट कॅम्प या ठिकाणी जाण्यास विरोध करत आहे.
मात्र बिल्डर विकसक एस.आर.ए अधिकारी यांना हाताशी धरून किवळे येथे ट्रांजिस्ट कॅम्प मध्ये लोकांना जाण्यास भाग पाडत आहेत. एस.आर.ऐ काळाखडक ते किवळे येथील अंतर जास्त असल्याने काळा खडक वाकड येथील महिला धुण-भांड्याचे काम करत असल्याने, तसेच त्यांच्या लहान मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी किवळे येथील ट्रांजिस्ट कॅम्प हा लांब पडत असून संपूर्ण जीवनमान विस्कळीत होऊन जर घर भेटत असेल तर त्या घराचा काय उपयोग उद्याचे भविष्य आमचे लहान मुलं आहेत.त्यांचा शाळेचा प्रश्न आहे.आमचा कामाचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला वाकड जवळ कुठेही ट्रांजिस्ट कॅम्प द्यावा आम्ही त्या ठिकाणी जाण्यास तयार आहोत.बिल्डर केतुल सोनीगरा व त्यांचे साथीदार हे आम्हाला बुद्धिबळाच्या कवड्या सारखे वापरत आहेत.
त्यामुळे आमचा तेथील कोणत्याही जागामालक किंवा जागेशी आमचा वाद नसून आमचा वाद बिल्डर सोबत आहे.तेथे ज्या दोन जागा मालकांचा वाद चालू आहे. त्यांच्यामध्ये आम्हाला भरडलं जाऊ नये, उद्या जर आमचे सर्व गैरसोय झाली. आमच्यातलं कोणी दगावलं किंवा आमच्यावर जागा मालकाने गुन्हे दाखल केले.तर त्यास जबाबदार कोण राहणार, त्यामुळे आम्हाला आमच्या राहण्याची व्यवस्थित सोय करावी. व काळा खडक वाकड येथील संपूर्ण घरे पाडावी.तोपर्यंत आम्हाला आहे त्या स्थितीत महापालिका प्रशासनाने राहू द्यावे.महापालिका प्रशासन रोड वाइंडिंग च्या नावाखाली बाकीची घरे पाडण्याचा घाट घालत आहे. सदर ठिकाणी काही लोकांचे सातबारे आहेत. तर काही लोकांना इंद्रा गांधी हवास योजनेमध्ये घरकुल देखील मिळालेले आहे. त्यांची कोणतीही सोय न करता डायरेक्ट घर पाडण्याचे नोटीस त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे घरमालकांना किंवा घराच्या जागेत राहणाऱ्या नागरिकांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार महानगरपालिका प्रशासनाने काढून घेतला आहे.
त्यामुळे सदर चाललेला एसआरए प्रकल्प हा बेकायदेशीर व चुकीच्या मार्गाने चालू आहे असे दिसून येत आहे. किवळे येथे ट्रांजिस्ट कॅम्प मे जय एंटरप्राइजेस तर्फे सदर आर्किटेक यांना बांधकाम परवानगी दिली आहे. मात्र तो ट्रांजिस्ट कॅम्प कॅम्प रद्द करून दुसऱ्या ठिकाणी तो उभारावा व आमच्या भौतिक गरजांच्या सुविधा आम्हाला मिळतील अशा प्रमाणे आमचा विचार करावा. अशी मागणी एस आर ऐ प्रकल्पातील नागरिकांनी आंदोलनात केली आहे. यावेळी सनय छत्रपती शासन पक्षाचे प्रमुख नामदेव जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दत्ता गायकवाड, काळा खडक वाकड घर बचाव या समितीचे प्रमुख बाळासाहेब जोगदंड, दुर्गा आप्पा देवकर शंकर इंगळे व आदी नागरिक आंदोलनात उपस्थित होते. मात्र या आंदोलनाची दखल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त घेतील का? त्या नागरिकांवरती अन्याय करतील असा प्रश्न संपूर्ण काळा खडकवासीयांना पडला.असून याची चर्चा संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात पसरली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



