कासारवाडी,दि.१५ जुलै २०२५(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी-विकास साळवे):-कासारवाडी येथील ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नजीक असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावाच्या इमारतीला असलेली सिमा भिंत ही कित्येक दिवसांपासून धोकादायक स्थितीत असू शकते या भिंतीमुळे एखादा माठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जवळच ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय असून याठिकाणाहून संबधित अधिकारी कित्येकवेळा येत जात असतील परंतू या धोकादायक स्थितीत असलेल्या सिमा भिंतीकडे मात्र कुणाचेच लक्ष वेधल्या जात नाही.की,जाणिवपुर्वकच अपघात घडल्याशिवाय याकडे लक्षच द्यायचे नाही असे अधिका-यांनी जणुकाही ठरवूनच टाकलेले दिसत आहे.
परंतू असे असले तरी या धोकादायक सिमा भिंतीमुळे या भिंती शेजारून जाणा-या पदपथावरून चालणा-या पादचा-यांना मात्र या भिंतीमुळे धोका निर्माण झाला आहे,यातून एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
ही धोरादायक सिमा भिंत पुर्णपणे खचली असून ती एका बाजूला झुकलेल्या स्थितीत आहे.यातून पालिका प्रशासनाची पुर्णत: उदासिनता दिसून येत आहे.यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो.या खचलेल्या धोकादायक भिंतीमुळे परिसरातील नागरीकांमध्ये व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
स्थायी समीतीकडे मंजूरीसाठी हा विषय असून त्याची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली आहे,लवकरच त्याचे काम सुरू होईल.-मनोज सेठीया सह शहर अभियंता, क्रिडा विभाग मनपा

पालीकेचे संबधित जबाबदार अधिकारी फारच बेजबाबदारपणे वागतात,एखादा मोठा अपघात घडल्याशिवाय त्यांचे अशा गोष्टींकडे लक्षच नसते,ही खुप गंभीर बाब आहे,अशा धोकादायक गोष्टींकडे तात्काळ लक्ष देऊन अशा गोष्टी अपघात घडण्यापुर्वी दुरूस्त करून घेतल्या पाहीजेत व होणारा अनर्थ टाळला पाहीजे.-संतोष म्हात्रे,सामाजिक कार्यकर्ते
अशा ब-याच गोष्टी आहेत ज्याबाबत अधिका-यांकडे वारंवार तक्रारी कपूनसुध्दा जबाबदार अधिकारी तक्रारींकडे लक्ष देत नाहीत,त्यामध्ये वाढते अतिक्रमणे असतील,रस्त्यावर टाकल्या जाणारा कचरा असेल,तसेच रस्रत्याचे काम चालू असतांना रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडे नसणे,सध्या स्थितीत जलतरण तलावाच्या इमारतीची खचलेली सिमा भिंत असेल.अशा गोष्टीमधून काहीतरी अनर्थ होण्यापुर्वी जबाबदार अधिका-यांनी तात्काळ लक्ष वेधून त्यावर कारवाई केली पाहीजे.संबधित अधिका-यांना एखाद्या धोकादायक गोष्टीची तक्रार केल्यानंतर करून घेऊ एवढेच त्यांच्याकडून सांगितले जाते मात्र कारवाई शुन्यच असते.- यलप्पा वालदौर,स्थानिक नागरीक



