Home ताज्या बातम्या आनंद जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

आनंद जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

0

वाकड,दि.०३ जुलै २०२५(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-  पोस्टल कॉलनी वाकड येथील आनंद जेष्ठ नागरिक संघाची १२वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि २९ जून २०२५रोजी बर्ड व्हॅली वाकड येथे ठीक अकरा वाजता संपन्न झाली. पहिल्या सत्राची सुरुवात राष्ट्रगीताने होऊन त्यानंतर मागील महिन्यात देवाज्ञा झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.मयूरभाऊ कलाटे, मा नगरसेवक पिंपरी चिंचवड, सौ स्वातीताई कलाटे मा. नगरसेविका पिंपरी चिंचवड,मा वृषाली मरळ अध्यक्षा जेष्ठ नागरिक महासंघ हे होते तर अध्यक्षस्थानी आनंद जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री भागवत कोल्हे हे होते.

या प्रसंगी प्रथम सरस्वती पूजन श्री मयूर भाऊ ह्यांच्या हस्ते होऊन त्यानंतर सौ स्वाती कलाटे,मा स्वाती मरळ,आनंद संघाचे अध्यक्ष भागवत कोल्हे,उपाध्यक्ष मुरलीधर लहाने,सचिव श्री सुरेश बोरकर,कोषाध्यक्ष माधव बह्राटे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.संघामध्ये नव्याने स्थापन झालेल्या सांस्कृतिक कला मंचतील कलाकार प्रतिभा गवळे,पुष्पा ढवळे, विभा दरेकर, सुनील जोशी,माधव  बह्राटे, हर्षाली देसाई,हेमांगी बोंडे, विनया सरदेसाई,संगीता साठे,सुनीता सफई इत्यादीनी गणेश वंदना, शारदा स्तवन,स्वागत गीत,समूह गीत सादर केले. उपस्थित मान्यवर  मयूर कलाटे,सौ स्वाती कलाटे, श्रीमती स्वाती मरळ,दीप्ती रहटे,विष्णू तांदळे,मुकुंद दमकले, सारिका अटेकर यांचा स्वागत आणि सत्कार समारंभ संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष श्री भागवत कोल्हे,श्री मुरलीधर लहाने,श्री  सुरेश बोरकर,श्रीमती स्वाती मरळ यांच्या हस्ते पार पडला.

   माजी नगरसेविका   सौ स्वाती कलाटे यांनी संघ हा जेष्ठांसाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे सांगितले .श्रीमती मरळ यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली. मा.कोल्हे यांनी संघाच्या कार्याची महती सांगणारी  श्रीमती विजया चौधरी यांची कविता वाचून दाखवली.  उपस्थित ज्येष्ठ  पत्रकार बाबू डिसोझा ,मुक्त  पत्रकार सौ.माधुरी डिसोजा,अहवाल पुस्तिका तयार करणारे अविनाश रानडे यांच्यासह 75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासद किशोर भावे,सुहास राव,राजाराम डिके, कामराज पाटील, सावित्रीदेवी विश्वकर्मा, विनया मुजुमदार, शकुंतला पवार आदींचा सत्कार शाल,श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.या प्रसंगी प्रशांत डिके यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी काही विशेष सत्कार करण्यात आले. त्यामध्ये नवविवाहित जेष्ठ दाम्पत्य श्री मुरलीधर लहाने व सौ आसावरी लहाने यांचा तसेच सौ  रेखा गिरमे आयुष संस्थेची योग परीक्षा उत्तीर्ण  होऊन योग शिक्षिका पदवी झाल्याबद्दल,श्री प्रवीण कुलकर्णी यांचा संघासाठी सर्वोच्च निधी संकलन केल्याबद्दल असे विशेष पुरस्कार देण्यात आले. दुसऱ्या सत्रात श्री बोरकर यांनी मागील वर्षच्या मिटिंगविषयी सांगितले तर श्री मुरलीधर लहाने यांनी अहवाल वाचन केले तर जमा खर्च ,ताळेबंद, अंदाजपत्रक इ आर्थिक  बाबींची  माहिती माधव बह्राटे यांनी दिली.सभेच्या शेवटी पसायदान होऊन  कार्यक्रमाचा समारोप झाला.संपूर्ण  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विजया चौधरी यांनी  बहारदार पणे केले.आंनद जेष्ठ नागरिक संघाचे प्रसिद्धी विभागाची धुरा सांभाळणारे श्री अशोक बोंडे आणि सौ हेमांगी बोंडे  यांनी या सभेसाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + eighteen =