Home ताज्या बातम्या “जोशीनी आखलेली वेशी तुटली”,”अभिमान भोसले” ना कार्यकारी अभियंता पदावर बढती

“जोशीनी आखलेली वेशी तुटली”,”अभिमान भोसले” ना कार्यकारी अभियंता पदावर बढती

0

पिंपरी,दि.२४ जुन २०२५ (प्रजेच विकास न्युज प्रतिनिधी):- शासन अधिसूचना,(दि. २५ एप्रिल, २०२५)शासन शुध्दीपत्रक, शासन अधिसूचनेन्वये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० तयार करण्यात आले होते. सदर अधिसूचनेमधील परिशिष्ट (३) मधील नियम १०.१ मधील तरतूद “राजपत्राच्या दिनांकापूर्वी नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यास परीक्षा उत्तीर्ण होण्यामधून पुढील बाबतीत सूट देण्यात येईल,असेअसताना.तत्कालीन प्रशासन अधिकारी विठ्ठल जोशी यांनी परिक्षेची अट दाखवुन प्रमोशन अडवले होते.

माञ काहि कर्मचार्‍यांनी कोर्टात आणि मागास्वर्गीय आयोगात धाव घेतली,आणि नगरविकास विभागाने २५ एप्रिल २०२५ रोजी शासनाचे शुद्धीपञक जारी केले. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील सुमारे २००० ते २५०० कर्मचार्‍यांच्या बढतीचा प्रमोशनचा प्रश्न मार्गी लागला. ह्या शासन शुद्धीपञक जारी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे विद्यमान सरचिटणीस, शहर उपअभियंता उच्चशिक्षित (एम.टेक, एलएलबी), अभिमान भोसले यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या “कार्यकारी अभियंता” (शहरी गिरणी विभाग) पदावर बढती मिळाली. दि.१७ जुन २०२५ च्या महापालिका ठराव बैठकीत प्रशासक आयुक्तांनी मंजुरी दिली.अभिमान भोसले यांची कार्यकारी अभियंता पदावर बढती झाल्यामुळे महापालिका कर्मचारी महासंघात व मागासवर्गीय कर्मचार्‍यान मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 − 4 =