Home ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी सवलतीची बस पास योजना राबवा

पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी सवलतीची बस पास योजना राबवा

0

पिंपरी,दि.२१ जुन २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) बस प्रवासासाठी सवलतीच्या दरात बस पास योजना राबविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघन (बापू) काटे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले आहे.

काटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी PMPML बस प्रवासाकरिता २५% ते ७५% सवलतीच्या दरातील बस पास योजना सुरू केली होती. विविध अटी आणि नियमांसह ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती.

शहरातील अनेक विद्यार्थी खडकी, पुणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरात शिक्षण घेण्यासाठी जातात. या विद्यार्थ्यांना २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातही PMPML बसेसमधून प्रवास करण्यासाठी २५% ते ७५% सवलतीच्या दरातील बस पास योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

या मागणीवर तातडीने कार्यवाही करून या योजनेची अंमलबजावणी करण्याची विनंती काटे यांनी केली आहे. तसेच, या संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती आपल्याला कळविण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या शिक्षणासाठीचा प्रवासाचा खर्च कमी होण्यास मदत होईल, असे मत काटे यांनी मांडले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + one =

error: Content is protected !!
Exit mobile version