Home ताज्या बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा देणारा -शितल मालते (पोनि)

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा देणारा -शितल मालते (पोनि)

0

राळेगाव ६ जून  २०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-मिलिंद धनविज):- छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. आपल्या मुलांना महाराजांचा इतिहास वाचायला लावणे गरजेचे आहे.त्यांच्यापासून स्फूर्ती मिळेल महाराजांचा इतिहास आम्हाला प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन नव्यानेच राळेगाव पोलीस स्टेशनला रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक शितल मालते यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन शिवतीर्थ येथे साजरा करण्यात आला याच दिवसाच्या औचित्याने तालुक्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरपंचायतीचे अध्यक्ष रवींद्र शेराम तर प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस निरीक्षक शितल मालते, सौ.भावना खंगन उपस्थित होत्या. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळेस सौ भावना खंगन यांनी इतिहास हा विषय नुसता मार्च घेण्यासाठी किंबहूना तो परीक्षेपुरता नसावा ती आपल्या आयुष्याची शिदोरी म्हणून वाचत राहिले पाहिजे असे विचार व्यक्त केले. नगरपंचायतीचे अध्यक्ष रवींद्र शेराम यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले तर प्रास्ताविक माजी प्राचार्य अशोक पिंपरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शंकर मोहुर्ले यांनी तर आभार प्रदर्शन राजू रोहणकर यांनी केले. पोलीस निरीक्षक शितल मालते या नव्यानेच राळेगाव पोलीस स्टेशनला रुजू झाल्याच्या निमित्ताने व त्या या पोलीस स्टेशनला पहिल्याच महिला पोलीस निरीक्षक असल्याने त्यांचा आयोजन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु.देवता अनिल पुरी लोकविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय खैरी वाणीज्य शाखा प्रथम, प्रतिक्षा विलासराव खंडाळकर कला शाखा प्रथम लमवि व कनिष्ठ महाविद्यालय झाडगांव मेघना पृथ्वीराज गिरी विज्ञान शाखा प्रथम मार्कण्डेय पब्लिक स्कुल बरडगांव, कु आकांशा राजेश कोहाड १० वी प्रथम, न्यु इंग्लीश हायस्कुल राळेगांव मोहित लक्ष्मण खेकारे व्दितीय न्यु इंग्लीश हायस्कुल राळेगांव, अथर्व मोहन भोरे तृतीय न्यु इंग्लीश हायस्कुल राळेगांव या गुणवंताचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी प्राचार्य अशोक पिंपरे, माजी प्राचार्य सुरेंद्र ताठे, भारत ठूणे, नितीन कोमेरवार नगरसेवक मंगेश राऊत ॲड मंगेश बोबडे ॲड अल्पेश देशमुख शंकर मोहुर्ले राहूल बहाळे संजय दुरबुडे योगेश इंगोले महेंद्र फुलमाळी, सैय्यद लियाकत अली, बाळासाहेब काकडे नितीन कोरडे नगरसेवक मधुकर राजूरकर शुभम चिडाम लोकेश गायकवाड चेतन बेंबारे सचिन कोठुरकर भूपेंद्र चांदेकर देवराव नाखले मंगेश पिंपरे भटकर सर रुपेश कोठारे महादेव ससाणे सार्थक बहाळे, दिक्षा नगराळे सौ वैशाली रोहणकर सौ भावना बहाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या सर्वच सदस्यानी परीश्रम घेतले .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 5 =

error: Content is protected !!
Exit mobile version