किवळे,दि.२३ नोव्हेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शिवसेना शिंदे गट पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष निलेश गुलाब तरस यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांचे समाज प्रबोधन पर भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.०० ते ९.०० वा या वेळेस इंदुरीकर महाराजांचे कीर्तन होणार आहे कार्यक्रमाचे, स्थळ:- बीआरटी रोड मुकाई चौक, किवळे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन समस्त किवळे ग्रामस्थ व प्रभाग क्रमांक १६ किवळे- रावेत मामुर्डी साईनगर, सर्व शिवसेना पदाधिकारी जेष्ठ नागरिक संघ व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण ग्रामस्थ परिवाराच्या वतीने या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून महाराजांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Home ताज्या बातम्या शहरध्यक्ष निलेश तरस यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या किर्तेनाचे आयोजन