Home ताज्या बातम्या चिंचवड विधानसभेचे विजयी उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते निवडणूक...

चिंचवड विधानसभेचे विजयी उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र सुपूर्द

0

थेरगाव, दि. २३ नोव्हेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): -चिंचवड विधानसभा सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार श्री. शंकर पांडुरंग जगताप यांना निवडणूक निरीक्षक श्री. मनवेश सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

चिंचवड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत २१ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे मतमोजणी कक्षात सुरळीत पार पडली. या निवडणुकीमध्ये श्री. शंकर जगताप विजयी झाले. त्याबद्दल त्यांना थेरगाव येथील मतमोजणी कक्षात निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे, मतमोजणी आराखडा व स्ट्रॉंग रूम व्यवस्थापन समन्वय अधिकारी शिरीष पोरेडी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वय अधिकारी बापूसाहेब गायकवाड, मनुष्यबळ व्यवस्थापन किरण कुमार मोरे, सेक्टर ऑफिसर समन्वयक अजिंक्य येळे, समन्वय अधिकारी उमेश ढाकणे, टपाली मतदान समन्वय अधिकारी अमित पंडित, कायदा व सुव्यवस्था व पोलीस डिप्लॉय मेटाप्लॅन आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी राजेंद्र डुंबरे, माध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड, निवडणूक सहाय्यक श्वेता आल्हाट, नीलिमा थेऊरकर आदी उपस्थित होते.

Previous articleपिंपरी विधानसभेचे विजयी उमेदवार अण्णा बनसोडे यांना निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र सुपूर्द
Next articleभोसरी विधानसभचे विजयी उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र सुपूर्द..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + nine =