Home ताज्या बातम्या आपलेपणाने बोलून दाखवत,बाळासाहेब ओव्हाळ यांच्या बद्दल आदर

आपलेपणाने बोलून दाखवत,बाळासाहेब ओव्हाळ यांच्या बद्दल आदर

0

पिंपरी,दि.११ नोव्हेंबर २०२४( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- बाळासाहेब ओव्हाळ यांच्या बद्दल आदर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच या परिसरातील व्यापारी, उद्योगपती, खेळाडू, महिला, युवाशक्ती यांच्याशी सतत संपर्कात राहणाऱ्या बाळासाहेब ओव्हाळ यांचा आदर आहेच. पण वृद्ध नागरिकांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्याप्रमाणे नियोजित केलेल्या योजनादेखील नागरिक उत्साहाने आणि आपलेपणाने बोलून दाखवत आहेत. अर्ज भरल्यानंतर लागलीच बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरी परिसरातील गाठीभेटींमध्ये प्रामुख्याने इतर राजकीय पक्षातील पक्षांतर्गत असंतुष्टांच्या भेटी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अध्यात्मिक संस्था, प्रख्यात व्यावसायिक, कलाक्षेत्रातील दिग्गज यांच्याशी संपर्क साधला आणि सर्वत्र त्यांचे आपुलकीने स्वागत झाले. पिंपरी मतदार संघामध्ये मध्ये एकूणच दांडगा व्यासंग त्यांना नक्कीच यशस्वी करून जाणार असल्याचे बोललं जात आहे.
संवाद दौऱ्यामध्ये बाळासाहेब ओव्हाळ यांच्या समवेत निशा ओव्हाळ, गौतम गायकवाड, विनोद कांबळे,सचिन सकाटे,मालन गायकवाड,संगिता कुंवर, प्रियांका शिंदे, अनिरुद्ध भागवत,अनुजा जाधव, रेखाताई, उत्तम पांढरे, सतिश राठोड,करण कणसे, संजय गायकवाड,आदी कार्यकर्त्यांसह अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + nine =