Home ताज्या बातम्या शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार

शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार

0

चिंचवड,दि.०५ नोव्हेंबर २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बुधवारी (दि. ६) काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथील अँबियन्स हॉटेल शेजारील मैदानात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही पहिलीच प्रचार सभा संपन्न होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  पुढील 6 दिवसात 21 सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही या सभा होणार आहेत. या सभांचा शुभारंभ उद्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काळेवाडी फाटा येथील सभेतून होणार आहे.

या सभेला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) यांच्यासह मित्रपक्ष महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या सभेसाठी महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.

Previous articleस्थानिक उमेदवारामुळे रखडलेल्या वाकडच्या विकासाला स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच गती
Next articleमहायुतीचे उमेदवार शंकर जगताप पाठींबा देत; नाना काटे यांची माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × three =