Home ताज्या बातम्या अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा

अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठिंबा

0

चिंचवड,दि.१३ नोव्हेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी जगताप यांना पाठींब्याचे पत्र दिले आहे.

शंकर जगताप यांना शहरातील विविध सामाजिक संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी 52% समाजाची सामाजिक संघटना असून यामध्ये कर्मचारी आघाडी, विद्यार्थी  आघाडी, महिला आघाडी तसेच शेतकरी आघाडी व ऑल इंडिया गोर बंजारा समाज संघटना यांचा समावेश आहे. संघाने पाठिंबा जाहीर करत जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व ओबीसी समाजबांधवांना केले आहे.

याप्रसंगी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार, कार्याध्यक्ष नानासाहेब टेंगळे, प्रसिद्धीप्रमुख कादंबरी वेदपाठक, पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा शोभा झिंगाडे, पुणे शहराध्यक्ष निलेश ढहाळे, भाजपा मंडल उपाध्यक्ष ललित म्हासेकर, स्वप्निल नावडे यांच्यासह संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या वतीने उमेदवार  शंकर जगताप यांचे “कमळ” चिन्हावर शिक्कामोर्तब करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी केले आहे.

सर्वप्रथम मी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष हनुमंत सुतार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे व सर्व ओबीसी समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी दिलेला पाठींबा या विधानसभा निवडणुकीच्या लढाईत आम्हाला नक्कीच बळ देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकार हे नेहमीच ओबीसी बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध असून भविष्यात पिंपरी चिंचवड शहरातील आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ओबीसी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सातत्यपूर्ण पाठपुरावा करेन. व आपल्या समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करेन.
             – शंकर जगताप
           (महायुतीचे उमेदवार)

Previous articleशंकर जगताप यांच्या प्रचार दौऱ्यात काळेवाडीकरांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीचा उच्चांक
Next articleलोकांचा प्रचंड उत्साह आणि आपुलकीने आता उमटवली शंकर जगतापांच्या आमदारकीवर वियजाची ‘मोहोर’ अश्विनी जगतापांचा “विश्वास”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 4 =