Home ताज्या बातम्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

47
0

मुंबई, दि. १० सप्टेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (दि. ९ )मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. शाह यांचे स्वागत केले.श्री. शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी श्री. शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. शाह यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे यांच्याशी संवाद साधला.

Previous articleशिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleपिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने च-होली येथे उभारण्यात आलेल्या सदनिकांची ताबा पावती देण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − three =