Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनियर इंजिनियर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील बेळगावकर यांची बिनविरोध निवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनियर इंजिनियर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील बेळगावकर यांची बिनविरोध निवड

30
1

पिंपरी,दि.२९ ऑगस्ट २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनियर इंजिनियर्स असोसिएशनची वार्षिक बैठक गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडली या बैठकीमध्ये सुनील बेळगावकर यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष- चंद्रकांत कुंभार,सचिव- संतोष कुदळे, सहसचिव- विपिन थोरमोठे, खजिनदार- महेंद्र देवरे, सह खजिनदार- सचिन मगर तसेच महासंघाचे प्रतिनिधी पदी अभिमान भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. वरील सर्व पदाधिकाऱ्यांचे व संचालक मंडळाचे सर्वांनी स्वागत व हार्दिक अभिनंदन केले. सर्व निवड प्रक्रियेतील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअर असोसिएशन मध्ये आनंद व उत्साह पूर्ण वातावरणाने संपूर्ण बैठक कार्यक्रम पार पडला, सर्व स्तरातून सुनील बेळगावकर यांचे अभिनंदन व स्वागत होत आहे.

Previous articleभारतीय संस्कृतीचा आदर राखून अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याची निर्मिती केली :डॉ धनंजय भिसे
Next articleशिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

1 COMMENT

  1. आता तरी एक विनंती आहे साहेबांना ज्युनिअर सिनियर नाही कळत आम्हाला आम्ही सहज नागरिक आहोत …..कृपया साहेबांनी रस्त्यावरचे खड्डे आणि रस्त्यांची लेव्हल नीट करावी हीच विनंती हात जोडून…..आम्ही पण भरतो ओ पूर्ण टॅक्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 5 =