Home ताज्या बातम्या नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, काँग्रेसचा एकनिष्ठ चेहरा काळाच्या पडद्याआड

नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, काँग्रेसचा एकनिष्ठ चेहरा काळाच्या पडद्याआड

28
0

नांदेड,दि.२६ ऑगस्ट २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे हैदराबाद येथे उपचार चालु आसताना सोमवारी पहाटे तीन वाजता किम्स रुग्णालयात निधन झाले. गेल्या दोन आठवड्यापासून ते हैदराबादमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला ते डायलिसिस करीत होते. परंतू या महिन्यात पक्षाची नांदेड येथे बैठक आसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ॲम्बुलन्समधून त्यांना हैदराबाद येथे दाखल केले होते. परंतू प्रकृतीत सुधार होत असतानाच सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खासदार चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभूत केले होते.
नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे एकनिष्ठ चेहरा आणि सर्वांच्या मनावर राज्य करणारे वसंतराव चव्हाण अखेर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची पोकळी कधीही भरून निघणार नाही व पुन्हा नांदेड जिल्ह्याला असा नेता मिळणे नाही त्यामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शोक काळा पसरली आहे

Previous articleमातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – क्रीडा मंत्री संजय बनसोडे
Next articleपुणे येथील वस्तू व सेवा कर भवन नूतन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − eight =