Home ताज्या बातम्या रिपाई आठवले गटाची पिंपरी चिंचवड शहराची नवी कार्यकारणी जाहीर, कोणाला मिळाले कोणते...

रिपाई आठवले गटाची पिंपरी चिंचवड शहराची नवी कार्यकारणी जाहीर, कोणाला मिळाले कोणते पद?

75
0

पिंपरी,दि.१३ ऑगस्ट २०२३ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहर पक्षाचे रिपब्लिकन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या जम्बो कार्यकारणीतील ५८ पदे वाटप करण्यात आले. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांताताई सोनकांबळे व बाळासाहेब भागवत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज भाई शेख,खाजाभाई शेख अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस,सम्राट जकाते पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, लाताई ठोसर महिला आघाडी प्रदेश सचिव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व पक्षाच्या कामकाजाबद्दल व पक्षाच्या वाढी संदर्भात सर्वांशी हितगुज साधत मार्गदर्शन केले. अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षाचा प्रोटोकॉल आपल्या पक्षाच्या बॅनर लावू नये व तसेच पक्षाचा प्रोटोकॉल वापरून पक्ष वाढीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करावे पक्षात आलेल्या सर्वांचे स्वागत आहे. जर पिंपरी विधानसभा रिपब्लिकन पक्षाला नाही सोडली तर तिन्ही विधानसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार उभे केले जातील असा दावा देखील शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी केला त्यामुळे सर्वांनी एकमताने पिंपरी विधानसभा रिपब्लिकन पक्षालाच मिळाली पाहिजे असा संकल्प करून साहेबांची व इतर मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पिंपरी विधानसभेचा मतदार संघ आरपीआयला सोडवण्यासाठी थेट ठोस पावलं उचलण्याचे ठरवले आहे. शहराध्यक्ष चा हा आक्रमकपणा पाहून शहरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारणीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येतील असे एकंदरीत वातावरण अल्पाईन हॉटेल पिंपरी या ठिकाणी ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी सात वाजता घेतलेल्या मीटिंगमध्ये दिसून आले सदर यावेळी या कार्यक्रमाला उपस्थिती मा.नगरसेवक अंकुश कानडी, मा.नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ,दुर्गप्पा देवकर, शादाब पठाण रत्नमाला सावंत,किरण समिंदर,विनोद चांदमारे,श्रीमंत शिवशरण साहेब, विकास गाडे-थेरगाव शाखाध्यक्ष, राहुल व्हावळ-थेरगाव शाखा उपाध्यक्ष, आयु. दिनकर मस्के आनंद नगर शाखा अध्यक्ष वअन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

रिपाई (आठवले)पक्ष पिंपरी चिंचवड शहरांमधील पदाधिकाऱ्यांची निवड पुढील प्रमाणे

शहरध्यक्ष-कुणाल वैजनाथ व्हावळकर
सरचिटणीस-दयानंद वाघमारे,बाबा सरवदे
शहर उपाध्यक्ष-रहीम भाई खुरेशी ,रमेश दादाराव गजरमल,नवनाथ डांगे,बापू सरवदे,संजय गायकवाड,सुनील वाघमारे,अशोक गायवाड,भरत खरात,राजेंद्र कांबळे
सचिव-बालाजी जाधव,सुरेश आठवले,राघु साबळे,अजय सुंबरे,संभाजी वाघमारे,अतुल जाधव,नंदू म्हस्के,हरी नायर,साहेबराव ससाणे
शहर संघटक-शंकर इंगळे,मोहन म्हस्के,संदीप तोरणे,मनोज जगताप
कार्याध्यक्ष-राजू उबाळे,गणेश भोसले
सहकार्याध्यक्ष-सुनील पवार,शेखलाल नदाब,भारत भगत
खजिनदार-गौतम गायकवाड
चिंचवड विधानसभा अध्यक्ष-नितीन आण्णा पट्टेकर
चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष-बाळासाहेब कोकाटे,रघु गव्हाळे,निलेश ओव्हाळ
चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष-विष्णू सोनवणे
पिंपरी विधानसभा अध्यक्ष-लक्ष्मण दादा शिरोळे
पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष– दिलीप थोरात,कृष्णा जाधव
भोसरी विधानसभा अध्यक्ष-संजय सरोदे
भोसरी विधानसभा उपाध्यक्ष-शरद फडतरे,अमोल वारभुवन,शेषराव सूर्यवंशी
भोसरी विधानसभा संघटक-राघू बनसोडे
ज्येष्ठ उपाध्यक्ष-विलास गरड ,अशोक गायकवाड
सल्लागार-विलास पाटील,बापू गायकवाड
उपकार्याध्यक्ष– दगडू शिरसागर
प्रसिद्ध प्रमुख-अनिल तांगडे
संघटक सचिव-अक्षय धुनघव
नवनिर्वाचीत कार्यकरणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहेत.

Previous articleघरोघरी तिरंगा अभियानाचा ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून राज्यस्तरीय शुभारंभ
Next articleकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत यशश्री शिंदे यांच्या कुटुंबियांची घेतली संत्वानपर भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 12 =