पिंपरी,दि.१६ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मोरया सामाजिक प्रतिष्ठान संचलित लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप पॅरामेडीकल कॉलेजच्या ऋतुजा बाबर, प्राजक्ता पाटील, ज्योती म्हस्के, गायत्री जाधव या विद्यार्थीनींचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते राज्यातील पॅरामेडीकल क्षेत्रातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. पॅरामेडीकलमधील पिंपरी-चिंचवडच्
जागतिक कौशल्य दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप पॅरामेडीकल कॉलेजच्या विद्यार्थीनींचा मंत्री आठवले आणि लोढा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या चारही विद्यार्थीनींना उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून राज्य शासनाचे प्रमाणपत्र देण्यात आले. पॅरामेडीकलमधील पिंपरी-चिंचवडच्
लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप पॅरामेडीकल कॉलेजच्या या विद्यार्थिनींनी आपल्या अथक परिश्रम आणि उत्कृष्ट कार्याने हे यश संपादन केले आहे. या चारही विद्यार्थिनींनी मिळविलेल्या राज्यस्तरावरील या यशाबद्दल कॉलेजचे संचालक गणेश अंबिके, सर्व शिक्षकवर्गाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, “लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने मोरया सामाजिक प्रतिष्ठानने पॅरामेडीकल कॉलेज सुरू केले आहे. याठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्राला आवश्यक असणारे मनुष्यबळ पुरविण्याच्या उद्देशाने विविध अभ्यासक्रम मोफत शिकविले जातात. लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप पॅरामेडीकल कॉलेजच्या चार विद्यार्थीनींचा राज्य शासनाकडून उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सन्मान होणे ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. या चारही विद्यार्थीनींचे आणि कॉलेज प्रशासन व सेवकवर्गाचे मी मनापासून अभिनंदन करतो.”