Home ताज्या बातम्या मुकाई चौकातील सरसकट कारवाईत ते सर्व कंटेनर का उचलले नाहीत?देणघेण गौडबांगल आहे...

मुकाई चौकातील सरसकट कारवाईत ते सर्व कंटेनर का उचलले नाहीत?देणघेण गौडबांगल आहे का?

118
0

चिंचवड,दि.२६ जुन २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- क्षेञिय अधिकार्‍याच्या अर्शिवादाने मुकाईचौकात खुलेआम अनधिकृत कंटेनर लावुन चालतोय व्यवसाय,अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील सांगतायेत सरसकट कारवाई मग ते कंटेनर उचलण्यास क्षेञिय अधिकार्‍यास का जमत नाही?का करतायत टाळाटाळ?आयुक्त साहेब नक्की गौडबांगल काय?क्षेञिय अधिकार्‍यास पाठीशी घालणारे उपायुक्त यांच्यावर कारवाई करणार का? की पाठीशी घालणार या कडे संपुर्ण शहराचे लक्ष लागुन आहे.१८ते २२ मे २०२४ दरम्यान केलेली मुकाई चौकातील कारवाई झाल्यापासून ते आज पर्यंत कंटेनर उचलले नाही,त्यामुळे अधिकारी कर्मचार्‍यांनवर शंका निर्माण होत आहे.
पदपथांवरील अतिक्रमण निमूर्लनासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वाहतूक शाखा तसेच स्थानिक पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबविण्यात यावी. मात्र या कारवाईनंतरही पदपथांवर पुन्हा अनधिकृत विक्रेत्यांनी ठाण मांडले तर. ना कारवाईची ना दंडाची भिती, अशी परिस्थिती एकंदरीत आहे. कितीही कारवाई करा, आम्ही अतिक्रमण करणारच, अशा भूमिकेत अनधिकृत विक्रेते असल्याचे दिसून येते.त्यांना स्थानिक स्वयंघोषीत नेत्यांच बळ,कारवाई होऊ नये म्हणुन आमदार,खासदारांना साकडे,मग काय गेला फोन थांबली कारवाई,
त्यामुळे अतिक्रमणे वाढत आहेत,तशीच परस्थिती अनधिकृत बांधकामाची देखील आहे.हे सर्व चालते ते महाशय ब क्षेञिय अधिकारी यांच्या कृपने आणि अर्शिवादाने? असे चिञ दिसत आहे.आयुक्त साहेब क्षेञिय अधिकार्‍यांना तुमची भिती उरलेली नाही.मनमानी कारभार चालु आहे.कारवाई नावाला दाखवली जात आहेत.तर द्वेष भावनेने मोजक्यांच लोंकानवर कारवाई केली जात आहे. अनधिकृत पञाशेड कंटेनर व फुटपाथवर सरसकट कारवाई न करता कुटील पणाने ठराविक लोकांनवर व ठराविक ठिकाणी सुपारी घेतल्या सारखी कारवाई करत असल्याचे नागरीकांन मध्ये चर्चा पांगली आहे.

शहरातील बहुतांश रस्ते तसेच पदपथही प्रशस्त आहेत. मात्र पदपथांवर अनधिकृत विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे. यात हातगाडी, पथारीवाले मोठ्या संख्येने आहेत. या विक्रेत्यांनी पदपथ गिळंकृत केलेले आहेत. परिणामी पादचाऱ्यांना पदपथाऐवजी सत्यावरून ये-जा करावी लागते, तसेच या विक्रेत्यांकडून खरेदीसाठी ग्राहक भर रस्त्यात वाहन थांबवितात. तसेच हातगाडीजवळ रस्त्यावर ग्राहकांची मोठी गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा होतो. अपघातही होतात, त्यामुळे पदपथांवरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून अतिक्रमण निर्मूलन करण्यात यावे, अशी मागणी ब प्रभागातील शहरवासीयांकडून केली जात आहे.
प्रशासनाकडून ब प्रभागातील शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली नाही. त्यातील अनेक ठिकाणी पदपथांवर तसेच रस्त्यावर आठवडी बाजार व पथारी तसेच रस्त्या लगतचे अनाधिकृत पञाशेड,टपरी कंटेनर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व अनधिकृत पालिकेच्या विनापरवाना शेड,कंटेनर टपर्‍या शटर दुकाने केल्याचे समोर आले. त्यामुळे अनेक ठिकाणी कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले तरी अद्याप कारवाई झालेली नाहि.सरसकट कारवाई सांगितल्यास थोडाफार पाडापाड व ढॅमेज फोटो पुरते करुन क्षेञिय अधिकारी प्रशासनाची जनतेची दिशाभुल करत आहेत.आयुक्त साहेब काही ठराविक व्यापार्‍यांन साठी किंवा मागासवर्गातील लोकांन साठीच ही कारवाई आहे का? असा सवाल जनतेतुन येत आहे.

त्यानुसार संयुक्त पथकाकडून दंडात्मक कारवाई करून विक्रेत्यांच्या हातगाडी टपरी आदी.दंड भरुन सोडले जाते माञ ब प्रभाग क्षेञिय अधिकार्‍यांन कडुन काही ठराविक पथारी व्यापार्‍याची पिळवणुक केल्याचे समजते.अशा अधिकार्‍यांनमुळे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे नाव खराब होत आहे.आयुक्त साहेब वेळीच लक्ष द्या,आणि ब प्रभागातील नागरिकांना होणारा ञासातुन मुक्त करा.अन्यथा अनेक नागरीकांनकडु कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये.यासाठी आयुक्त साहेब वेळीच लक्ष द्या

लवकारात लवकर लायन्सन धारकांना हाॅकर्स झोन तयार करुन द्यावे,रस्त्याच्या कडेचे अनअधिकृत पञाशेड,कंटेनर,शटर दुकाने काढावीत त्यांना नियमित व अधिकृत विकासकाडुन पाहणी करुन परवानगी देऊ करावी.अन्यथा कुणावरही कारवाई करु नये,ब प्रभाग क्षेञिय अधिकार्‍यांवर देखील कारवाई करावी.अधिकारी जनतेचा असतो माञ हा अधिकारी खुणशीपणाने काम करतो त्यामुळे प्रभागातील गोष्टी प्रभागात फिरल्या शिवाय कळत नाहीत,या आधिचे सर्व क्षेञिय अधिकारी चांगले होते,कारवाई केली पण सरसकटच अशी खुणसबाजी हेवेदेवे कधी केले नाहीत असे फुटपाथ पथारी व्यापार्‍याकडुंन बोलले जात आहे.त्यामुळे हि चर्चा संपुर्ण शहरात पसरल्याने किंवा ब प्रभागात काही उलट सुलट चालु आहे का? असल्यास काही वावग वाटायला नको.कोणी पञ दिल्यास किंवा बातमी दाराने बातमी केल्यास त्यावरही खुणस ठेवली जाते.त्यामुळे ब प्रभाग परिसरात उलटसुलट चर्चाना उधान आले आहे..

Previous article“PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही?” : हायकोर्ट
Next articleवारकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका….मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight + nineteen =