Home ताज्या बातम्या दिवंगत आण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

दिवंगत आण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

64
0

पिंपरी,दि.२६ जुन २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष,माजी खासदार दिवंगत आण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महापालिकेचे आयुक्त राहूल महिवाल यांनी आण्णासाहेब मगर यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस तसेच प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी अतिरीक्त आयुक्त उल्हास जगताप,सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर,उप आयुक्त आण्णा बोदडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशीला जोशी तसेच कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे सहकारी मनोज माछरे, नितीन समगीर, विजया कांबळे तसेच मुख्य लिपिक वसिम कुरेशी,देवेंद्र मोरे आणि
महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.पिंपरी-चिंचवड नगरपालिकेच्या जडणघडणीत पहिले नगराध्यक्ष आण्णासाहेब मगर यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.शहरातील पायाभूत सुधारणा आणि मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. नागरिकांसाठी विस्तृत रस्ते, पाणीपुरवठा, शाळा सार्वजनिक दवाखाने, उद्याने,वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे.

Previous articleवारकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका….मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन
Next articleभंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × one =