Home ताज्या बातम्या ब प्रभाग क्षेञीय अधिकार्‍याच्या आर्शिवादाने चालु असलेल्या अनधिकृत बांधकाम..? हाय टेशन विजेचा...

ब प्रभाग क्षेञीय अधिकार्‍याच्या आर्शिवादाने चालु असलेल्या अनधिकृत बांधकाम..? हाय टेशन विजेचा शॉक लागून बांधकाम मजुरांचा मृत्यू

142
0

चिंचवड,दि.११ जुन २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- क्षेञीय अधिकार्‍याच्या अर्शिवादाने अनधिकृत बांधकाम वाढत आहेत,अशी बातमी नुकतीच प्रजेचा विकास ने प्रसिद्ध केली होती,आणि असात बेजबाबदार पणा समोर आला आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब क्षत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील बळवंत कॉलनी, चिंचवडे नगर चिंचवड येथे एक २२ वर्षीय बांधकाम मजुरांचा बांधकाम काम करत असताना सकाळी १२ च्या सुमारास बांधकाम जवळील हायटेन्शनचा विजेचा शॉक लागुन जागीच मृत्यू झाला आहे पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहे .

ब प्रभाग क्षेञीय आधिकारी,बीट निरिक्षक,अनधिकृत बांधकाम विभाग अधिकारी,अनधिकृत बांधकाम धारक, अनधिकृत करणारे बांधकाम ठेकेदार,व संबंधित अधिकारी यांचा वर गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी सुनील जावळे, महासचिव वंचीत बहुजन युवा आघाडी यांनी केली आहे.

ब प्रभाग क्षेञीय अधिकारी व संबधीत आधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे एका गरीब कुटुंबातील घरातील करता धरता तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या मृत्यू मुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका किती चांगली कामगिरी करत आहे हे आपल्या दिसलेच असेल.यात ब प्रभाग क्षेञिय अधिकारी गरीबांचा विचार करत नाहीत,त्यांची नोकरी म्हणजे त्यांचा परिवार आठवतो मग या गोर गरीब मजुरी करणारे टपरी पथारी धारक यांच पोट कुटुंब रोजगार अशा अधिकार्‍याला का दिसत नाही.धुतल्या तांदळासारेख वागायचे मग काम करताना दुजाभाव का काय साटलोट आहे.अशा अधिकार्‍याची व संबधीत चौकशी करण्यात यावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त साहेब संबंधित अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विभाग यांच्या वर कारवाई करतील का ? की पाठीशी घालतील,?असा सवाल वंचीतचे सुनील जावळे यांनी उपस्थित केला आहे. सर्व संबंधिता वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अन्यथा जनअंदोलन उभारण्यात येईल.वंचीत च्या स्टाईलने अंदोलन केले जाईल असा इशारा वंचीतचे जावळे यांनी दिला आहे,लवकरात लवकर गुन्हा दाखल करुन संबधीत अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुनील जावळे यांनी पोलीस आयुक्त सो. व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्या कडे केली आहे

Previous articleक्षेञिय अधिकार्‍याच्या अर्शिवादाने ब प्रभागातील अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामात वाढ?
Next articleबालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine + seventeen =