Home ताज्या बातम्या मावळ लोकसभेत नक्की चालय काय? दोघांच्या प्रचाराची ताकत सारखी….कोणाच पारड जड..?

मावळ लोकसभेत नक्की चालय काय? दोघांच्या प्रचाराची ताकत सारखी….कोणाच पारड जड..?

134
0

पिंपरी,दि.०३ मे २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मावळ हा महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला व ह्यामध्ये पुणे व रायगड जिल्ह्यांमधील प्रत्येकी ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
२००९,२०१४,२०१९ लोकसभेत मावळ लोकसभा शिवसेने कडे राहीला आहे.माञ यंदा २०२४ ला हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा प्रसंग पाहिला नाही तर अनुभवायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत फारकत घेतल्यानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना स्वतःकडे ठेवण्यात ते यशस्वी झाले आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा नव्याने शिवसेना मशाल या चिन्हावर निवडणुका लढवावी लागत आहे. मावळ लोकसभेत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे व त्यांना मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात असल्याने हा लोकसभा मतदारसंघ सातत्याने शिवसेनेकडे राहिला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे निवडणूक रिंगणात आहेत.तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे हे रिंगणात आहेत. मात्र संजोग वाघेरे हे अजितदादा पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या नेत्यांपैकी एक नेता आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात अजित दादांची एक ताकद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवसेनेकडे आल्याने पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरात मावळ लोकसभा मतदारसंघ हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा आवाज दुमदुमत आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मावळ लोकसभा निवडणुक ही जनतेने हातात घेतली,असून संजोग वाघेरे निवडून येतील असा दावा केला आहे.

तर दुसरीकडे महायुतीचे सरकार बनेल व श्रीरंग बारणे हॅट्रिक करतील असा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. मात्र ह्या लोकसभेमध्ये कोणाचा पारड जड असणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.सध्याच्या परिस्थितीमध्ये दोघांचाही प्रचार ची ताकद समान असून दोघांचीही प्रचार सारखाच पाहायला मिळत आहे. मात्र नागरिकांच्या तोंडून यंदाची निवडणूक ही निवडणूक सारखी वाटत नाही असे उदगार येत आहेत. कारण नात्यागोत्याचं राजकारण उमेदवार रिंगणात जरी ३३ असले तरी चर्चा मात्र दोनच उमेदवारांची होत असल्याने वाघेरे आणि बारणे यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. दोघांचेही कार्यकर्ते आणि दोघांचेही नेतेमंडळी सध्या तरी हवेत असून प्रचाराची मांडीआळी मंद गतीने दिसत आहे. त्यामुळे मावळ लोकसभा याकडे संपूर्ण भारतातील लोकसभेचे लक्ष जरी लागून असले तरी मावळ लोकसभेत मतदानासाठी नागरिक १००% बाहेर पडतील हे मात्र संभ्रमात पाहिले जाते. संजोग वाघेरे यांचे कार्यकर्ते त्यांच्या परीने मोघममोघम प्रचारात घेरले असून निवडून येण्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वतःच्या पायावर दगड मारत हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने संभ्रमात असलेले कार्यकर्ते नेते बारणेंना मोठ्या मताने निवडून आणण्याचा प्रचार करत असले, तरी मात्र वरिष्ठ नेत्यांना स्थानिक लेव्हलच्या नेत्यांनवर व कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने दिल्ली आणि मुंबईवरून भाजपची एक टीम व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीम बारणेंच्या प्रचारात सामील झाली आहे. एका माजी महापौराला लोकसभेत हरवण्यासाठी विद्यमान खासदारांच्या बाजूने अनेक बडे नेते व महायुतीचे मुख्य घटक पक्ष रिंगणात उतरल्याने माजी महापौर संजय संजोग वाघेरे यांचं पारडं मात्र जड असल्याचे बोलले जात आहे.तर दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार हे मात्र समोर कोण आहे. याचा विचार न करता मी पुन्हा निवडून येईल हॅट्रिक करेल असा प्रचार करत आहे. नक्की मतदार दोन्ही उमेदवारांचे निरीक्षण परीक्षण करून मतदान करतील का? की उमेदवार न बघता पक्षाला बघून मतदान करतील हे मात्र मतदार राज्याच जाणून आहेत. अनेक कामे जनतेच्या मतदारांच्या मनात आहेत. मात्र ते बोलण्यासाठी थोडीशी कुण कुण दिसत आहे. संविधान बदलण्याची भाषा या संविधान बदलणार हा विषय मात्र यंदाच्या निवडणुकीत मुख्य विषय असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदार राजा कोणाची फिरकी घेणार आणि कोणाला मतदान करणार हे मात्र मतदार राजा स्वतः जाणून आहेत व येत्या १३ मेला मतपेटीत बॅलेट वर कोणाला मतदान करतील हे आपणास ४ जूनला निकालात पाहायला मिळणार आहे.
भाग-२(पुढील टप्यात)

Previous articleभोसरीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य देण्याचा संकल्प
Next articleदेहुरोड,विकासनगर किवळे भागात श्रीरंग बारणेंचा प्रचार न करण्याचा रिपाईचा ठराव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × two =