Home ताज्या बातम्या मावळ लोकसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार

मावळ लोकसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार

157
0

मावळ,दि.२९ एप्रिल २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली मावळ लोकसभा मतदारसंघातून ३५ उमेदवारांचे फॉर्म वैध ठरले होते. मात्र दोनच उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. तर तब्बल ३३ उमेदवार रिंगणात असून महायुती व महाविकास आघाडी यांच्या विरोधात तब्बल 31 उमेदवार रिंगणात असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात ह्या ३१ उमेदवारांन कडून प्रचार केला जाणार असून लोकशाहीच्या दिलेल्या हक्काप्रमाणे कोणाचे स्टार फिरणार आणि कोणाचे स्टार अडकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे मात्र मावळ लोकसभेचे मावळते खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे हॅट्रिक करणार का की संजोग वाघेरे यांचे स्टार चमकणार मावळ लोकसभेमध्ये आज तागायत कोणाचीही हॅट्रिक मावळच्या मतदारांनी दिलेली नाही.मतदारांची पसंती आणि मतदारांच्या अडचणी जाणून घेऊन मावळ लोकसभेच्या विकासाला गती देण्यासाठी मावळचे मतदार कटिबद्ध आहेत. येत्या १३ मे रोजी कोणाचं भवितव्य मतदान पेटीत लॉक केले जाईल, आणि ४ जूनला कोणाचा विजय होईल हे जाहीर केले जाईल, या कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मावळ लोकसभेकडे लागून आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ मध्ये  दि. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. वैधपणे नामनिर्दिष्ट २ उमेदवारांनी विहित मुदतीत आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये ३३ उमेदवार असणार आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया आज पार पडली असून निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी चिन्ह वाटप जाहीर केले.
या निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले होते. तर ३ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले होते. विहित मुदतीत २ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे उर्वरीत ३३ उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्या पक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे देण्यात आली. नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाने सूचीबद्ध केलेल्या १९० मुक्त चिन्हांमधून उमेदवारांनी दिलेला पसंतीक्रम, त्यांची मागणी विचारात घेऊन तसेच लहान मुलीच्या हस्ते सोडत पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मतराव खराडे, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार अभिजीत जगताप, मनिषा तेलभाते, सचिन मस्के यांच्यासह नामनिर्दिष्ट उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये चिन्ह वाटप प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनूसार पार पडली.

प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे, पक्ष आणि चिन्ह :-
राजाराम नारायण पाटील (बहुजन समाज पार्टी) – हत्ती
श्रीरंग आप्पा चंदू बारणे (शिवसेना) – धनुष्यबाण
संजोग भिकू वाघेरे पाटील [शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)] – मशाल
गोविंद गंगाराम हेरोडे (बहुजन मुक्ती पार्टी) – खाट
ज्योतीश्वर विष्णु भोसले (बळीराजा पार्टी) – ऊस शेतकरी
तुषार दिगंबर लोंढे (बहुजन भारत पार्टी) – शिट्टी
पंकज प्रभाकर ओझरकर (अखिल भारतीय परिवार पार्टी) – किटली
प्रशांत रामकृष्ण भगत (भारतीय जवान किसान पार्टी) – भेटवस्तू
महेश नारायणसिंग ठाकूर (धर्मराज्य पार्टी) – बॅट
माधवीताई नरेश जोशी (वंचित बहुजन आघाडी) – ऑटोरिक्षा
यशवंत विठ्ठल पवार (क्रांतिकारी जय हिंद सेना) – गॅस सिलेंडर
रफीक रशीद कुरेशी (देश जनहित पार्टी) – शाळेचे दप्तर
रफिक मैनुद्दीन सय्यद (आझाद समाज पार्टी) – पेनाची निब सात किरणांसह
शिवाजी किसन जाधव (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) – सिंह
संतोष मगरध्वज उबाळे (भीमसेना) – जेवणाचे ताट
इंद्रजीत धर्मराज गोंड (अपक्ष) – अंगठी
मुकेश मनोहर अगरवाल (अपक्ष) – कपाट
प्रफुल्ल पंडीत भोसले (अपक्ष) – हिरा
मधुकर दामोदर थोरात (अपक्ष) – टायर
राहुल निवृत्ती मदने (अपक्ष) – ट्रक
सुहास मनोहर राणे (अपक्ष) – टॉर्च बॅटरी
मनोज भास्कर गरबडे (अपक्ष) – शिवणयंत्र
उमाकांत रामेश्वर मिश्रा (अपक्ष) – कॅमेरा
लक्ष्मण सदाशिव अढाळगे (अपक्ष) – टीव्ही
इकबाल इब्राहिम नावडेकर (अपक्ष) – जहाज
अजय हनुमंत लोंढे (अपक्ष) – नरसाळे
अॅड. राजू लालसो पाटील (अपक्ष) – सफरचंद
दादाराव किसन कांबळे (अपक्ष) – प्रेशर कुकर
चिमाजी धोंडिबा शिंदे (अपक्ष) – दुर्बिण
राजेंद्र मारूती काटे (अपक्ष) – नारळाची बाग
हजरत इमामसाहब पटेल (अपक्ष) – ड्रिल मशिन
मारूती अपराई कांबळे (अपक्ष) – तुतारी
संजोग रविंद्र पाटील (अपक्ष) – चिमणी

उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे :
गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी व अपक्ष)
भाऊ रामचंद्र आडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष)

 

Previous articleशंकर जगताप यांना बहुजन मित्र पुरस्कार प्रदान
Next articleआता कसं…शिरूर लोकसभा निवडणूकीसाठी ३२ उमेदवार रिंगणात कोल्हे-अढळरावांच्या अडचणीत वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 − 11 =