Home ताज्या बातम्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा बॅनर लावलेला अज्ञात समाजकंटकाने काढला

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा बॅनर लावलेला अज्ञात समाजकंटकाने काढला

0

किवळे,दि.१३ एप्रिल २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पॅंथर दत्ताभाऊ गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त किवळे गावात शुभेच्छा चा बॅनर लावला होता. पण मात्र काही अज्ञात समाजकंटकांनी तो बॅनर काढला आहे. काढण्याची घटना पहाटे सकाळी दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी घडले आहे याच किवळे गावात याआधी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या बॅनर वरून वाद झाला होता.त्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बॅनर काढल्याचे लक्षात येताच दत्ता गायकवाड यांनी रावेत पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी पोलीस देखील आले सीसीटीव्हीचे पाहणी पोलीस करत आहेत मात्र पोलिसांनी अद्याप मात्र कोणावरही गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल कोणाला तिरस्कार आहे अशा वावड्या चर्चांना उधाण आला आहे. त्यामुळे रावेत पोलीस प्रशासन यावर नक्की काय कारवाई करणार याकडे मात्र संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे. दत्ता गायकवाड रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात कार्यरत असून आंबेडकर चळवळीचा पॅंथर कार्यकर्ता म्हणून दत्ता गायकवाड यांची ओळख आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − four =

error: Content is protected !!
Exit mobile version