Home ताज्या बातम्या भाऊसाहेब भोईर यांच्या साठी मावळ लोकसभेची जागा सोडावी- अजित गव्हाणे

भाऊसाहेब भोईर यांच्या साठी मावळ लोकसभेची जागा सोडावी- अजित गव्हाणे

165
0

पिंपरी,दि.१२ मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देशामध्ये लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. त्या संदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने आम्ही मावळ लोकसभा मतदार संघ संदर्भात सदर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मा. अजितदादा यांच्या माध्यमातुन पिंपरी चिंचवड शहरात केलेली विकास कामे, आणि त्यांची निर्णयक्षमता, विश्वासार्हता; अजित दादा मुळेच शहराचा एवढा विकास झाला आहे. मावळ विधान सभेचे आमदार सुनिल शेळके व पिंपरी विधानसभा मतदारसंघा मध्ये आण्णा बनसोडे हे आपल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचेच आमदार आहेत, अशातच झालेल्या चिंचवड येथील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे उमेदवार मा. नाना काटे यांना सुमारे १ लाख मते मिळालेली आहेत. एवढी संवेदनशील निवडणूक असून देखील आपण सुमारे १ लाख मतांपर्यंत मजल मारली आहे.

तरी आम्ही पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने ३३- मावळ लोकसभा मतदारसंघ गेली ३० वर्षे राजकारणात सक्रीय असणारे मा. भाऊसाहेब भोईर यांच्यासाठी मागणी करीत आहोत. कार्यकर्ता म्हणून त्यांची संपूर्ण कारकीर्द सर्वश्रुत आहे. विद्यार्थीदशेपासून ते समाजकारण व राजकारणात सक्रीय आहेत. सन १९९२ साली महानगरपालिकेवर नगरसेवक पदी पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून सलग ५ वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत; त्याचबरोबर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येथील कामाचाही त्यांचा अनुभव असून सांस्कृतिक क्षेत्रामध्येही त्याचे योगदान मोठे आहे. नुकतेच त्यांनी १०० व्या ऐतिहासिक नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करून शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली. त्यामुळे शहरातील विकासकामे, पक्षाची ताकद, व मा. भाऊसाहेब भोईर यांची दीर्घ कारकीर्द ई. सर्व पाहता ३३- मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांच्यासाठी निश्चितपणे योग्य राहील. भाऊसाहेब भोईर यांचा मावळ भागात चांगला जनसंपर्क व नातीगोती असून उरण, कर्जत व पनवेल मतदार संघांमध्ये देखील त्यांचा पूर्वीपासून संपर्क आहे.

तरी आपण ३३- मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साठी सोडावा व मा. भाऊसाहेब भोईर यांचा उमेदवारी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आम्ही पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.अशी माहिती पञकार परीषदेत रष्र्टवादीचे पि.चि शहरध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली.यावेळी महिला शहरध्यक्षा कविता अल्हाट,इच्छुक उमेदवार भाऊसाहेब भोईर,युवक अध्यक्ष शेखर काटे,कविताताई खराडे,प्रतिक सांळुके,तुषार ताम्हाणे,विशाल वाकडकर,प्रशांत सपकाळ,पंकज भालेकर,अक्षय माचरे,सचिन आवटे,प्रसाद कोलते,गणेश गायकवाड,संकेत जगताप,भागवत जवळकर,ओंकार विनोदे,सागर बोराटे आदी.पदिधिकारी उपस्थित होते

Previous articleप्राधीकरणातील १०६ भूमिपूत्रांना अखेर मिळाला न्याय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नाला अखेर यश
Next articleसंजोग वाघरेंना मावळचा फिक्स खासदार करण्याचा पिंपरीगाव ग्रामस्थांचा निर्धार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × one =