देहुरोड,दि.०६ मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीच वातावरण रंगत असताना लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही गुन्हेगारांना आळा घालुन व त्यावर निर्बंध करण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. त्याच धर्तीवर देहूरोड विकास नगर या ठिकाणी पुन्हा टोळी युद्धाने डोके वर काढले आहे का? सध्या पिंपरी चिंचवड शहरात खुनाचे प्रकार वाढताना दिसत आहे.त्यावर नागरीकांच्या मनामध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखाच्या मुलांची हत्या झाली असुन सद्या देहुरोड विकासनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीत दि.५ मार्च २०२४ रोजी राञी च्या वेळेत विकास नगर किवळे नेटके कॉलनी,साई दर्शन सोसायटी समोर मयत विशाल विजय थोरी या युवकाचा डोक्यात कुंडी व बांबूचे दांडके, सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून निर्घुण खून करण्यात आला आहे देहूरोड पोलिसांनी ४ संशयीत आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पुढील तपास पोलीस करीत आहेत.
बातमी अपडेट होत आहे…..