Home ताज्या बातम्या बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस देहरोड पोलिसांची कारवाई

बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस देहरोड पोलिसांची कारवाई

219
0

देहुरोड,दि.२७ फेब्रुवारी २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-प्रत्येक जण आपापली उपजीविका भागवण्यासाठी रोज काहीना काही करत असतो कोणी चांगला पर्याय निवडतो तो कोणी वाम मार्गाचा पर्याय देखील निवडतात असाच प्रकार देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला असून थेट भारतीय चलनातील हुबेहू असणाऱ्या पाचशेच्या नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुकाई चौक या ठिकाणी ह्या छापलेल्या पाचशेच्या बनावट नोटा वितरित करण्याच्या उद्देशाने आरोपी येणार आहे अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना समजली त्या अनुषंगाने देहूरोड पोलिसांनी सापळा रचून बनावट चलनी नोटा बनवणार्‍यांना अटक केली आहे.

देहूरोड पोलीसांनी मुकाई चौकाकडुन आदर्शनगरकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावला होता बातमीच्या वर्णना वरुन एक व्यक्ती होंडा शाईन मोटार सायकलवरून आला.त्याच मोटार सायकलसह आरोपीस ताब्यात घेवुन त्याची चौकशी करत अंगझडती घेतली.त्याच्या जवळ कब्जात भारयतीय चलानातील ५०० रुपयच्या १४० बनावट नोटा मिळुन आल्या.त्यास ताब्यात घेऊन देहूरोड पोलीस स्टेशन गु.रजि. नं. ९३/२०२४ भा.दं.वि. कलम ४८९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचेकडे पोलिसी खाक्या दाखवत अधिक तपास केला असता,आरोपीने त्याचेकडे मिळालेल्या बनावट नोटा भोसरी गावच्या हद्दीत, दिप लॉन्स जवळ, दिघी मॅक्झीन, ता. हवेली, जि. पुणे येथे छापत असल्याचे सांगितले व दाखविले, सदर ठिकाणी देहूरोड पोलीसांनी छापा मारला असता.त्या ठिकाणी ०४ इमस ऑफसेट प्रिंटींग मशिनवर बनावट भारतीय चलनातील नोटा छापताना मिळुन आले. ३०० बनावट नोटा, इंडीयन करंसी पेपरवर नोटांचे चित्र प्रिंट केलेले ११९७ पेपर, नोटा छापण्यासाठी लागणारी ऑफसेट प्रिंटींग मशिन, लॅपटॉप, प्रिंटर, पैसे मोजण्याची मशीन, इंडीयन करंसी पेपर, शाई, पेपर कटींग मशिन व इतर नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य सापडले.व जप्त करण्यात आले आहे. सदर ठिकाणी नोटा छापणारे ०५ आरोपी मिळुन आले. अद्याप पर्यंत एकुण ०६ आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.

आपा पर्यंत ५००/- रुपये दराच्या भारतीय चलनाच्या बनावट ४४० नोटा आरोपींकडुन जप्त झाल्या असुन अर्धवट छापलेल्या ४७८४ बनावट नोटा व १००० करन्सी पेपर जप्त केलेले आहे.
आरोपी सुरेश यादव याने आलीबाबा या वेबसाईटवर स्वतःचे अकाउंट उघडुन त्या मार्फतीने चीन मधुन भारतीय करंन्सीचे पेपर ऑनलाईन मागविल्याचे आढळुन येत आहे.सर्व आरोपींना ०७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असुन पुढील सविस्तर तपास करण्यात येत आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त साो, श्री. विनयकुमार चौबे सोा, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, मा. पोलीसउपायुक्त परिमंडळ-२ बापू बांगर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री. घेवारे सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन फटांगरे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष जाधव, पो. हवा. बाळासाहेब विधाते, पोहवा प्रशांत पवार, पो.ना सुनिल यादव, पोलीस अमंलदार किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, मोहसीन आत्तार, युवराज माने, विवेक भिसे, राजेंद्र चव्हाण, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे, सागर पंडीत, निलेश जाधव यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Previous articleखोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी,मागितली २० लाखांची खंडणी, दोन पोलिस कर्मचार्‍यां सह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल
Next articleबिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + 13 =