Home ताज्या बातम्या सुप्रसिध्द पार्श्वगायक मा. शान (शांतनू मुखर्जी) यांना “आशा भोसले पुरस्कार जाहीर- भाऊसाहेब...

सुप्रसिध्द पार्श्वगायक मा. शान (शांतनू मुखर्जी) यांना “आशा भोसले पुरस्कार जाहीर- भाऊसाहेब भोईर

162
0

चिंचवड,दि.०३ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठाण यांच्या सहकार्याने व सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत गेली २४ वर्षांपासून जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नावे ” आशा भोसले पुरस्कार” दिला जातो, देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकारास आशा भोसले यांच्या वाढदिवशी म्हणजे ८ सप्टेंबर रोजी हा पुरस्कार जाहीर केला जातो. आज पर्यंत मा. लता मंगेशकर, खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायणजी, रुपकुमार राठोड, अवधूत गुप्ते आणि सलील कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यंदाचे या विशेष पुरस्काराचे हे २० वे वर्ष असून, हा २० वा पुरस्कार सुप्रसिध्द पार्श्वगायक मा. शान (शांतनू मुखर्जी) यांना जाहीर करताना परिषदेला आनंद होत आहे. (१ लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे) अशी माहिती भाऊसाहेब भोईर(अध्यक्ष:-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिं.चिं. शाखा) यांनी पञकार परिषदेत देण्यात आली.

यंदाचा हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कामगार कल्याण मैदान, भोईर नगर, चिंचवड पुणे-३३ येथे होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

यावेळी शान यांच्या गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत “रजनीगंधा” हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य सादर होईल तरी सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा अशी विनंती परिषदेतर्फे भाऊसाहेब भोईर(अध्यक्ष:-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिं.चिं. शाखा) यांनी केली आहे.या वेळी किरण भोसले(उपाध्यक्ष),सुहास जोशी(प्रमुख कार्यवाहक),राजेंद्र बंग(कोषाध्यक्ष),नरेंद्र आम्ले(सदस्य),संतोष शिंदे(सदस्य) उपस्थित होते.

Previous articleअजित गव्हाणे मित्र परिवाराकडून मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत
Next articleरावेत मधील संस्थाचालकावर “पोक्सो” कायद्याखाली कारवाई करा – प्रा. कविता आल्हाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + seventeen =