Home ताज्या बातम्या माता रमाई स्मारका साठी पिंपरीत बेमुदत धरणे अंंदोलन…

माता रमाई स्मारका साठी पिंपरीत बेमुदत धरणे अंंदोलन…

178
0

पिंपरी,दि.२३ जानेवारी २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- माता रमाई भिमराव आंबेडकर स्मारकाचे काम त्वरीत चालू होत नसल्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन पिंपरी चौक, भीमश्रुष्टी, बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी या ठिकाणी माता रमाई स्मारक समिती प्रमुख धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वात आज पासुन सुरु करण्यात आले आहे.पिंपरी चिंचवड महा पालिकेचे दार झिजवुन देखील दुर्लक्ष होत असल्याने अंदोलनाची वेळ आली आहे.स्मारकाचे काम गेली पाच ते सहा वर्षे झाली मंजूर होऊन तरी देखील अजूनही या ठिकाणी काम सुरू झाले नाही.वारंवार पत्रव्यवहार करून पालिकेतील अधिकार्‍यांना भेटून देखील काम सुरु होत नाही. स्मारकसाठी जागा अजून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ताब्यात घेतलेली नाही. सर्व समाजबांधवांची महानगरपालिकेकडून दिशाभूल होताना दिसत आहे. आमच्या सर्व आआंबेडकरी चळवळीतील कार्यकत्यांचा व समाज बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहात का असा प्रश्न आमच्या मनात येत आहे.अशी माहिती धुराजी शिंदे यांनी दिली.त्यामुळे आज दि २३ जानेवारी २०२४ रोजी पासून भीम सुष्टी च्या कमानीच्या बाजूला बेमुदत धरणे आंदोलण सुरु केले आहे तरी महापालिका प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा हे अंदोलन तीव्र केल जाईल.यावेळी परमेश्वर जगताप, अरुण मैराळे, माऊली बोराटे, दत्ताभाऊ गायकवाड, वैभव गायकवाड, कांचन जावळे, नारायण मस्के, गौतम तायडे,रजनीकांत शिरसागर, शिवाजी झोडगे, संजय वाघमारे,भीमाशंकर शिंदे, पांडुरंग राठोड, रामभाऊ ठोके, बळीराम काकडे, रावसाहेब कोल्हे, कैलास केदारनाथ, संगीता भंडारे, लालासाहेब गायकवाड, संतोष रणसिंग, गोविंद गाडे, रवींद्र सावळे,महायान प्रभाकर म्हसरे, दीपक भिंगारदिवे, रवींद्र अभंग, हरिभाऊ साळवे, जहांगीर कांबळे,विकी तामचीकर,सुरेश निकाळजे, दीपक वारभूवन, दिलीप समिंदर, केशव साळवे, दीपक लोखंडे, सुधाकर वारभुवन, अजिज शेख, संतोष डंबाळे, मुन्ना पठाण, अमर चौरे, राष्ट्रपाल तेलगोटे, श्रीपत ओव्हाळ, प्रवीण कांबळे, राजश्री कांबळे, सारिका भोसले, राजन नायर,वसंत कसबे, बी.बी शिंदे, रुहीनाज शेख, अंजना गायकवाड, मुकुंद रणदिवे, श्रीरंग वाघमारे,राजू गायकवाड,हिरा लांडगे,दत्ता प्रधान, राजकुमार चव्हाण,युवराज तिकटे,शरद कांबळे, उमेश गायकवाड, राजेंद्र पवार, राजू सरोदे, सुरेश गायकवाड, निवृत्ती जाधव, नंदकुमार शिंदे आदी उपस्थित होते.

Previous articleअयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात राम लल्ला विराजमान
Next articleअजित गव्हाणे मित्र परिवाराकडून मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 4 =