Home ताज्या बातम्या श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या...

श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

164
0

पिंपरी,दि.२१ जानेवारी २०२४ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो दिवस अखेर आला सोमवार,दि.२२जानेवारी २०२४रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.त्यानिमित्ताने पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने दिवसभर विविध उपक्रम, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पञकार परिषदेत अशी माहिती, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक/अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आनंदत्सोव व विविध कार्यक्रम आयोजित केले आहे, सर्व कार्यक्रम श्रीगणेश मंदिर, संत तुकारामनगर , पिंपरी येथे पार पडणार आहे याची सर्वानी नोंद घ्यावी तसेच महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी पहाटे ६.०० वाजता श्रीगणेश अभिषेक व श्री रामलल्ला यांच्या मूर्तीचे पूजन,सकाळी ८.०० वाजता रामरक्षा पठण सुरुवात, त्यानंतर सकाळी ९.३० वाजता होम हवन पूजन संपन्न होणार आहे. ११.३० वाजता होम प्रज्वलन सोहळा व मंत्र घोष होईल. दुपारी १२ ते १ या कालावधीत अयोध्येत पार पडणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षपण एलईडी वर दाखवण्यात येणार आहे.अशी माहिती यंशवत भोसले यांनी दिली.सर्वाना प्राणप्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा देखील दिल्या..

Previous articleनमो चषक २०२४ निमित्त रावेत मध्ये रांगोळी व चिञकला स्पर्धा आनंदमय वातावरणात संपन्न
Next article‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यापूर्वी मीरा रोड येथे दोन समुदायांमध्ये तणाव वाढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − 8 =